नागपूर: दिवाळी तोंडावर असतांनाच नागपुरात सोमवारी (३० ऑक्टोंबर) सकाळी १०.३० वाजतानंतर दोन तासातच सोन्याच्या दरात प्रति दहा ग्राम तब्बल ३०० रुपयांची घट नोंदवली गेली. हे दर नागपुरात किती आहे, हे आपण बघूया.
नागपुरातील सराफा बाजारात ३० ऑक्टोबरच्या सकाळी १०.३० वाजता प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६२ हजार रुपये होते. हे दर दोन तासांनी १२.३० वाजता ३०० रुपयांनी घसरून ६१ हजार ७०० रुपये नोंदवले गेले. तर १२.३० वाजता नागपुरातील सराफा बाजारात २२ कॅरेटचे दर ५८ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४९ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार १०० रुपये होते.
हेही वाचा… पाच कोटी सोने तस्करीचा तपास आता मुंबईतून; डीआरआयच्या मुख्य कार्यालयाकडून सखोल तपासणी
तर चांदीचे दर प्रति किलो ७३ हजार ५०० रुपये होते. हे दर सोमवारीच सकाळी १०.३० वाजता प्रती दहा ग्रॅम २२ कॅरेटचे दर ५८ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४९ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ३०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७४ हजार रुपये होते. हे दर दिवाळीत वाढण्याचे संकेत रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी दिले.