नागपूर: केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर मागच्या वर्षी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. ही घरसण बरेच दिवस कायम असल्याने देशभरातील ग्राहकांना मोठा लाभ झाला होता. यंदाचा अर्थसंकल्पही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी सादर केला. त्यानंतर लगेच सोन्याच्या दरात प्रथम घसरण झाले. परंतु काही मिनटांमध्ये दरामध्ये असे काही बदल झाले की ग्राहकांमध्ये पून्हा चिंता वाढली आहे.
नागपूरसह देशभरात करोनानंतर सोन्याचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. मागच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सोन्यावरील सीमाशुल्क ६ टक्केपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर नागपूरसह देशभरात सोन्याच्या दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. ही घसरण बरेच दिवस सुरू असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. यंदाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५) सादर केला.
दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १० वाजता नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८२ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६४ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५३ हजार ८०० रुपये नोंदवले गेले होते. परंतु अर्थसंकल्प जाहिर झाल्यावर दुपारी १.३० वाजता हे दर किंचित घसरूण प्रति दहा ग्राम ८२ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६४ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५३ हजार ६०० रुपयापर्यंत खाली आले. परंतु थोड्याच वेळात दुपारी २.३० वाजता पून्हा दर पून्हा वाढून प्रति दहा ग्राम ८२ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६४ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५३ हजार ८०० रुपये असे वाढले. त्यामुळे सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.
चांदीच्या दरातही बदल…
नागपुरातील सराफा बाजारात अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५) सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १० वाजता चांदीचे दर ९४ हजार १०० रुपये प्रति किलो होते. हे दर दुपारी १.३० वाजता किंचित घसरून ९३ हजार ८०० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आहे. परंतु काही वेळानंतर दुपारी २.३० वाजता पू्न्हा दर वाढून ९४ हजार रुपये नोंदवले गेले.