चंद्रपूर : लग्नसोहळ्यातून चोरट्यांनी नववधूचे तब्बल २० तोळे सोने लंपास केले होते. ही धाडसी चोरी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने तीन ते चार आरोपींनी केली. पोलिसांनी या विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेत त्याच्याकडून ९ लाख २१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व एक चारचाकी वाहन, असा एकूण १७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, या चोरीतील चार आरोपी फरार आहेत.

भानापेठ येथील सूरज पेद्दुलवार यांच्या बहिणीचे लग्न नागपूर मार्गावरील शकुंतला लॉन येथे होते. लग्नासाठी आणण्यात आलेले १६ लाख रुपयांचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार पेद्दुलवार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात केली. सदरची चोरी ही धाडसी चोरी असल्याने रामनगर पोलिसांनी पथके तयार करून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, चोरी होऊन दहा दिवसांचा कालावधी झाला तरी, पोलिसांना चोरट्यांचा कोणताही थांगपत्ता लागला नाही.

Thief arrested, Thief arrested for stealing in Mumbai,
साधकाच्या वेशात चोरी करणारा चोरटा गजाआड; पुणे, पिंपरीसह मुंबईत वाईत चोरीचे गुन्हे
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
PMP passenger girl, PMP, Indecent behaviour with girl,
पुणे : पीएमपी प्रवासी तरुणीशी अश्लील कृत्य, पसार झालेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती
tires of seized cars stolen pune
पुणे : चतु:शृंगी पोलिसांनी जप्त केलेल्या मोटारींचे टायर चोरीला, पोलीस ठाण्याच्या आवारात चोरी झाल्याने खळबळ
Fraud with a young woman Mumbai, lure of marriage,
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
Jewelry worth five lakhs stolen from a bungalow in Navi Peth Pune news
नवी पेठेतील बंगल्यातून पाच लाखांचे दागिने चोरीला
Guy went to marry for the second time without getting divorced first wife creates ruckus in marriage hall video goes viral
नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं! दुसरं लग्न करताना अचानक समोर आली अन्; खतरनाक VIDEO व्हायरल

हेही वाचा – दुडुदुडू धावणाऱ्या कासवांच्या पाठीवर उपग्रह; समुद्रातील भ्रमणमार्ग शोधण्याचा प्रयत्न

हेही वाचा – यवतमाळ : खिडकीतून मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिकेचे छायाचित्रे घेतले!; पेपरफुट प्रकरणात ताब्यात घेतलेल्या मुख्य सुत्रधाराचा अजब दावा

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, हर्षल एकरे यांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. मध्यप्रदेश राज्यातील राजगड जिल्ह्यातील तीन ते चार चाेरट्यांनी या विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने ही चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेत त्यांच्याकडून ९ लाख २१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन, असा एकूण १७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. अधिकचा तपास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, रामनगर पाेलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या नेतृत्वातील पथक करीत आहे.

Story img Loader