गोंदिया : गोंदिया शहर पोलीस स्टेशनअंतर्गत भीमनगर सिंगलटोली संकुलमध्ये बुधवार १७ जुलै संध्याकाळी ८:३० वाजताच्या सुमारास तिघा मित्रांत वादातून दोघांनी मिळून तिसऱ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. गंगाधर विजय चंद्रिकापुरे (४२) रा. लक्ष्मीनगर असे या घटनेतील जखमीचे नाव आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भीमनगर सिंगलटोली परिसरात अश्या प्रकारे धारदार शस्त्राने हल्ला होण्याची ही एका महिन्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी झालेल्या घटनेत जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हल्ला केल्यानंतर दोघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. पण पोलिसांनी त्यातील एक आरोपी प्रशांत वाघमारे याला डोंगरगड (छत्तीसगड) येथून मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली.

Mahalaxmi murder case
“जर मी तिला मारले नसते तर तिनं…”, फ्रिज हत्याकांडात मृत आरोपीच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
person Murder in Chinchwad,
VIDEO: चिंचवडमध्ये हृदयात स्क्रू ड्रायव्हर भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
mira road police suicide
मीरा रोड मध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
union home minister amit shah remark india will be naxalism free by march 2026
मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त होणार काय? छत्तीसगडमध्ये आक्रमक नक्षलविरोधी कारवायांमुळे गृहमंत्र्यांचे वक्तव्य पुन्हा चर्चेत…
Delhi Crime Doctor Shot dead in Hospital
Doctor Murder : “शेवटी २०२४ मध्ये हत्या केलीच”, डॉक्टरच्या हत्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा गजाआड; सोशल मीडिया पोस्टही चर्चेत!
gangster Tamil Nadu arrested, gangster Tamil Nadu in Mumbai,
तामिळनाडूमधील कुख्यात गुंडाला मुंबईत अटक; हत्या, हत्येच्या प्रयत्नासारखे अनेक गुन्हे दाखल
attack on Prithvi deshmukh
धक्कादायक! ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर सशस्त्र हल्ला; कायदा व सुव्यवस्था…

हेही वाचा – चंद्रपूर: धक्कादायक! डॉक्टर मुलीने वैनगंगा नदीत उडी घेतली, आत्महत्या करण्यापूर्वी काढले व्हिडीओ

या प्रकरणातील दुसरा आरोपी हा रामटेकला पळून गेला आहे. गोंदिया शहर पोलीस त्याच्या मागावर पाठवले आहे. सदर हल्ला हा तिघा मित्रांत बाचाबाचीनंतर घडलेल्या वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना कळली असल्याचे गोंदिया शहर पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – कौटुंबिक नात्यांची वीण सैल होतेय का? कुटुंब न्यालयात खटले वाढले

आमदाराच्या आईची ऑनलाइन फसवणूक

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाचे आमदार विजय भरतलाल रहांगडाले यांच्या आईच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने १ लाख ८२ हजार ४८ रुपये एका अज्ञात व्यक्तीने आपल्या खात्यात वळते केले. ही घटना तिरोडा तालुक्यातील खमारी येथे घडली. तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या आई डेलनबाई भरतलाल रहांगडाले यांचे तिरोडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खाते आहे. त्यांच्या खात्यावर अज्ञात व्यक्तीने ७४४१०१७५७० हा मोबाईल क्रमांक सक्रीय करून, युपीआयच्या आधारे खात्यातून ३ ते १६ जुलै दरम्यान १ लाख ८२ हजार ४८ रुपये आपल्या खात्यात वळते केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आमदाराचे स्वीय सहायक ढोरे यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान याप्रकरणी नागपूर येथील रोशन शहारे (२७) या तरुणाला तिरोडा पोलिसांनी बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास नागपूर येथून अटक केली आहे. त्यांनी आपण गुगल पे च्या माध्यमातून हे पैसे आपल्या खात्यात वळते केल्याची कबुली तिरोडा पोलिसांना दिली आहे. पुढील तपास तिरोडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे करत आहेत.