विद्यार्थ्यांना विवेक मंदिर शाळेत सोडणारी बस गोंदिया येथील रिंग रोड जोड मार्गावरील पूल उतरताना तांत्रिक बिघाडामुळे तीस फूट खोल कोसळली. सुदैवाने विद्यार्थ्यांना शाळेत सोडल्यानंतर हा अपघात झाल्याने मोठे संकट टळले. या घटनेत जखमी झालेल्या चालकाला उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हे देखील वाचा – भंडारा : ‘देव तारी त्याला कोण मारी’; नदीपात्रात नाव उलटली तरी सहा जण बचावले!

ही बस १३ मुलांना शाळेत सोडल्यानंतर परतीच्या मार्गावर होती. गोंदिया येथील रिंग रोड बायपासचा पूल उतरताना बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ती पुलावरून ३० फुट खाली कोसळली. या अपघातात चालक जखमी झाला आहे.

हे देखील वाचा – अमरावती : मद्यधुंद शिक्षकाचा प्रताप, विद्यार्थ्यांना घरी पाठवले अन् वर्गातच केले ‘निद्रासन’

हे प्रकरण रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील की शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, असा वाद सुरू होता. यामुळे अपघातानंतर बराच वेळे घटनास्थळी कुणीच पोहचले नव्हते. हे प्रकरण शहर ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले. अपघातग्रस्त स्कूल बस शाळेची नसून ती पालकांनी स्वतः हून लावलेली खासगी बस असल्याची माहिती विवेक मंदिर शाळेचे मुख्याध्यापक कारता यांनी दिली.

Story img Loader