Mahayuti Won Gondia District Vidhan Sabha :गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया,आमगाव व अर्जुनी मोरगाव या चार ही विधानसभेत महायुतीचा भगवा झेंडा फडकला आहे. यात गोंदिया विधानसभेत तर आज पर्यंत कधी नव्हे असा पहिल्यांदाच कमळ फुलले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

१९ व्या फेरी अखेर भाजपचे विनोद अग्रवाल हे काँग्रेस चे गोपालदास अग्रवाल वर ५३ हजाराची आघाडी घेतली होती. तिरोडा विद्यमान आमदार भाजपचे विजय रहांगडाले यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवण्याकडे आगे कुच केलेली आहे. त्यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे रविकांत बोपचे यांच्यावर चाळीस हजाराची आघाडी घेतलेली आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पण आपले विरोधी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप बनसोड यांना ३६ हजार मतांनी मागे टाकले आहे.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
22 girls in government hostel poisoned in Nandurbar
नंदुरबार जिल्ह्यात शासकीय वसतिगृहातील २२ मुलींना विषबाधा
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
Gondia, EVM , Ballot Paper, CPI, BRSP,
गोंदिया : ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपर आणा’; भाकप, ‘बीआरएसपी’ आक्रमक
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

हेही वाचा…Wardha Assembly Election Results 2024 : वर्धा जिल्ह्यातून काँग्रेसची घराणेशाही हद्दपार

मागील निवडणुकीत मंत्री असताना सुद्धा राजकुमार बडोले यांचा पराभव झालेला होता पण २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी हा विजय मिळवत या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवलेला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जमाती करिता राखीव असलेली आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र भाजप कडून संजय पुराम पण आपले प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे राजकुमार पुराम यांना पराभूत केलेले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्वात चुरशीची लढत ही गोंदिया विधानसभेची मानली जात होती या काँग्रेस तर्फे दिग्गज नेते गोपालदास अग्रवाल हे चौथ्यांदा काँग्रेसची उमेदवारी मिळवून रिंगणात होते पण त्यांना विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून दारुण पराभव पत्करावा लागणार असे चित्र आहे.

गोंदिया जिल्ह्यातील दुसरी चुरशीची लढत ही अर्जुनी मोरगाव विधानसभेत होती येथे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्यासमोर माजी आमदार दिलीप बनसोड यांनी चांगलीच झुंज दिली पण अखेर राजकुमार बडोले यांनी तिरंगी लढतीत आपला विजय संपादन केलेला आहे.

हेही वाचा…Gadchiroli Election Result 2024 : धर्मरावबाबांनी अहेरीचा गड राखला, गडचिरोलीत भाजपचे वर्चस्व; आरमोरीत काँग्रेसची मुसंडी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रचारात आले असता आम्ही त्यांना गोंदिया जिल्ह्यातील चारही जागा महायुतीला जिंकून देणार असे ठामपणे सांगितले होते आणि निकालात ते आज दिसून आल्यामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झालेला असल्याचे भारतीय जनता पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष एड. येशूलाल उपराडे यांनी सांगितले.

Story img Loader