गोंदिया : मुंबई – हावडा लोहमार्गवरील काही गाड्यांचे वेळापत्रक १ जानेवारी २०२५ पासून रेल्वेच्या वेळापत्रकात आंशिक बदल करण्यात येत आहेत. यात या गाड्यांच्या सुटण्यापासून ते येण्यापर्यंतचा वेग वाढवून अनेक तासांचा ऑपरेटिंग वेळ वाचवण्यासाठी वेळापत्रक बदलले आहे. ही अत्यावश्यक कामे सातत्याने केल्याने, मेल एक्स्प्रेस गाड्यांमधील १० मिनिटांपासून ५५ मिनिटांपर्यंत आणि पॅसेंजर गाड्यांमधील ५ मिनिटे ते २०-२५ मिनिटांपर्यंतचा वेळ वेगवेगळ्या विभागांमध्ये वाचवला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचप्रमाणे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये देखील, १ जानेवारी २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन रेल्वे वेळापत्रकात, अप आणि डाऊन दिशेच्या १३१ स्थानकांमधील गाड्यांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. इतर स्थानकांमध्ये वेळापत्रक सारखेच राहणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये १ जानेवारीपासून ४५ प्रवासी, ८१ मेमू आणि २० डेमू अशा १४६ गाड्या नियमित क्रमांकाने धावतील.

हेही वाचा – चंद्रपूरमध्ये ९१ टक्के नागरिकांचा ‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट’ला कौल; नेमकं झालं काय?

क्रमांक १४६२४/१४६२३ फिरोजपूर-सिवनी-फिरोजपूर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेवरून धावणारी ही पातालकोट एक्स्प्रेस गाडी १ मार्च २०२५ पासून सुपरफास्ट करण्यात येत असून ट्रेनच्या क्रमांक आणि वेळापत्रकात बदल करण्यात येत आहेत. १ मार्च २०१५ पासून, फिरोजपूर-सिवनी-फिरोजपूर पाताळकोट एक्स्प्रेस २०४२४/२०४२३ या नवीन क्रमांकासह सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावेल.

हेही वाचा – अमरावती : बँकांपेक्षा खासगी सावकारांकडूनच शेतकऱ्यांना कर्ज, तब्बल ९७.८१ कोटी…

अशी आहे बदललेली वेळ

वेळापत्रक बदलामध्ये गोंदिया रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांच्या वेळेतही बदल होणार आहे. गोंदिया करिता जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस जी सध्या संध्याकाळी ६.०० वाजता गोंदियाला पोहोचते ती आता नवीन वेळापत्रकानुसार ६.३५ वाजता पोहोचेल. तसेच ट्रेन क्रमांक ११७५४ रीवा-इतवारी एक्स्प्रेस सकाळी ५.२५ ऐवजी ५.१० वाजता गोंदिया स्थानकात पोहोचेल. गाडी क्रमांक ११७५५ इतवारी-रेवा एक्स्प्रेस जी सध्या गोंदियाला ५.४५ वाजता पोहोचते ती आता गोंदियाला संध्याकाळी ६ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ११०७० गोंदिया-रायगड जनशताब्दी एक्स्प्रेस १ जानेवारीपासून गोंदिया स्थानकातून दुपारी २.४० ऐवजी आता २.३० वाजता सुटेल. तसेच गाडी क्रमांक ११०६९ रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी १.३० वाजता ऐवजी १.४० वाजता गोंदियाला पोहोचेल. गोंदिया करीता दुसरी महत्त्वपूर्ण गाडी असलेली गाडी क्रमांक १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस आता गोंदिया स्थानकावरून दुपारी २.४० ऐवजी दुपारी २.३० वाजता सुटेल अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिलेली आहे.