गोंदिया:- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ अंतर्गत गोंदिया-हिरडामाली, नागभीड-तलोदी रोड आणि ब्रम्हपुरी- नागभीड रेल्वे विभागात नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. त्यामुळे गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे सेक्शनवरील स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांचे संचालन गुरुवार ९ ते रविवार १२ जानेवारी दरम्यान बंद करण्यात आले. यात बल्लारशाह-गोंदिया, १० जानेवारी ला गोंदिया- वडसा, ९ आणि १० जानेवारी रोजी चांदाफोर्ट जबलपूर आणि जबलपूर-चांदाफोर्ट, ९, १० आणि ११ जानेवारी रोजी, गोंदिया बल्लारशाह, ११ जानेवारी रोजी, गोंदिया-बल्लारशाह आणि गोंदिया-बल्लारशाह आणि ११ जानेवारी रोजी चांदाफोर्ट – गोंदिया आणि वडसा – चांदाफोर्ट या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे ९ जानेवारी रोजी हैदराबादहून धावणारी गाडी क्रमांक हैदराबाद-रक्सोल एक्स्प्रेस ही बदललेल्या बल्लारशाह-नागपूर-गोंदिया लोहमार्गाने धावणार, तसेच १० जानेवारी रोजी दरबंगा येथून चालणारी दरबंगा-सिकंदराबाद ही गोंदिया-नागपूर बल्लारशाहकडे वळवण्यात आली आहे. आणि १० जानेवारीला यशवंतपुरवरुन सुटणारी यशवंतपुर- कोरबा ( कोरबा एक्स्प्रेस) ही पण बल्लारशाह नागपूर-गोंदिया मार्गे वळवण्यात आली आहे.
हेही वाचा – बुलढाणा : सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले, तब्बल सहा दरोडेखोरांनी…
हेही वाचा – यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी- रीवा – इतवारी एक्सप्रेस ३० मार्च पर्यंत रद्द
नागपूर-छिंदवाडा मार्गावरील रेल्वे पुलाशी संबंधित काम सुरू असून, त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील भीमलगोंडी भंडारकुंड रेल्वे सेक्शनवरील रेल्वे वाहतूक सध्या ठप्प आहे. या रेल्वे विभागावरील पुलाचे काम सुरू आहे. वरील विभागावर सुरू असलेल्या बांधकामामुळे, रीवा-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्स्प्रेस ही ३० मार्च २०२५ पर्यंत रद्द राहील आणि ट्रेन नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी – रीवा एक्स्प्रेस ही गाडी ३१ मार्च २०२५ पर्यंत रद्द राहील म्हणजेच या गाड्यांचे संचालन उर्वरित दिवशीही रद्दच राहील. याशिवाय नागपूर-शहडोल एक्स्प्रेस ३१ मार्च २०२५ पर्यंत नागपूर येथून सुटणारी नागपूर – शहडोल एक्सप्रेस ही व्हाया नागपूर – आमला – छिंदवाडा लोहमार्ग वरुन जाणार तसेच १ एप्रिल २०२५ पर्यंत शहडोल येथून सुटणारी गाडी शहडोल – नागपूर एक्सप्रेस ही छिंदवाडा – आमला – नागपूर मार्गावरून सुरू राहणार असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे.