गोंदिया:– दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी परत करण्यात यावी, अशी मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी मागणी केली असेल आणि या प्रकरणी याचिका दाखल केली असेल तर ती चौकशी पूर्ण होऊ द्या आणि सत्य बाहेर पडू द्या. या प्रकरणात एका माजी मंत्र्यांचा नाव घेतलं जात आहे. त्यांच्या या प्रकरणात काही सहभाग नसेल तर त्यांनी किंवा इतर कुणालाही घाबरण्याचे काही कारण नाही… पण म्हणतात ना चोराच्या मनात चांदणे.. त्याप्रमाणे हे सगळं काही सुरू असल्याचे मला वाटते ,असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. गोंदिया येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात करण्याकरिता पटेल गोंदिया येथे आले होते . याप्रसंगी अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट देत ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आता सीबीआय एक तपास यंत्रणा आहे. सगळ्यांच्या विश्वास या सीबीआय वर आहे. सीबीआयने या निष्कर्षावर येऊन अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्याच केली असे आपल्या क्लोजर रिपोर्ट मध्ये म्हंटले असेल तर तो पूर्ण चौकशी करूनच केलेला दावा असेल. आणि याला सगळ्यांनीच मान्य करायला हवे मत ही पटेल यांनी व्यक्त केले.
गोंदिया ते मुंबई विमान सेवा कधीपासून सुरू होणार असे प्रश्न विचारले असता खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की , गोंदिया ते मुंबई विमानसेवा सुरू करण्या करिता मी कटिबद्ध आहे, ही विमानसेवा या वर्षीच सुरू होणार आहे… या पूर्वी मुंबई विमानतळावर येथून येणारे विमान उतरवताना अडचण येत होती, जुन्या विमानतळावर स्लॉटही उपलब्ध नव्हते, मात्र आता नवी मुंबईत नवीन विमानतळ बांधण्यात आले आहे, त्यामुळे गोंदिया ते मुंबई विमानसेवा सुरू करणे निश्चितच शक्य होणार असून, या वर्षी लवकरच ही विमानसेवा सुरू होणार असल्याचा आशावाद खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. या प्रसंगी त्यांच्या सोबत अर्जुनी मोरगाव चे आमदार राजकुमार बडोले,माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.