नागपूर: गोंदिया जिल्हयात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला झालेल्या अपघाताचे तांत्रिक विश्लेषण करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला आहे. या अपघातात ११ प्रवासी ठार तर २८ प्रवासी जखमी झाले होते, हे विशेष. नागपूर जिल्ह्यातील हिंगण्याजवळ नुकतेच शालेय विद्यार्थ्यांना सहलीवर घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला होता. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बस उलटली. बस अपघातांच्या या मालिकेच्या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त विवेक भिमनवार सोमवारी नागपूर दौऱ्यावर आले होते. भिमनवार यांनी नागपुरातील संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर लोकसत्ताशी बोलताना भिमनवार म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही बसचे प्रकरण गंभीर आहे.

सदर बसमध्ये गतिरोधक यंत्र लागले होते. ते असतानाही इतका भीषण अपघात झाला कसा, हा प्रश्नच आहे. या अपघाताला परिवहन खात्याने गंभीरतेने घेतले आहे. अपघातच्या तांत्रिक व विश्लेषणात्मक अभ्यासाची जबाबदारी ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ला सोपवण्यात आली आहे. या संस्थेच्या अहवालानंतर परिवहन खात्याकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी आवश्यक पावले उचलली जातील, असेही भिमनवार यांनी सांगितले.

Zee Marathi Lakshmi Niwas serial promo
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची नवी मालिका ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, समोर आली संपूर्ण स्टारकास्ट
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Maharashtra government helmet compulsory decision
दोन मुलांना शाळेत सोडताना तीन हेल्मेट हाताळायचे कसे? संतप्त महिला पालकांचा सवाल
harshwardhan rane on vikrant massey career
विक्रांत मॅसीच्या निवृत्तीच्या घोषणेवर त्याच्या सहकलाकाराने व्यक्त केली शंका, म्हणाला “हा तर पीआर…”
Mulik joins Tingre for campaign in Wadgaon Sheri seat
आमदारकीचा शब्द मिळताच कट्टर विरोधक झाला मित्र, कुठे घडला हा प्रकार !
devendra fadnavis marathi news
“महाराष्ट्रात आम्ही अतिआत्मविश्वासात होतो”, देवेंद्र फडणवीसांनी केलं मान्य; ‘या’ दोन कारणांचा केला उल्लेख!
Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज

हेही वाचा : ‘समृद्धी’वर अपघातांसह गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ, दरोड्यासाठी वेगवान ‘एसयुव्ही’…

वाहन चालकाचा अहवाल मागितला

गोंदियातील अपघातग्रस्त बस चालकाची वैद्यकीय तपासणी पोलिसांनी केली आहे. त्याबाबतचा अहवाला परिवहन खात्याने मागितला आहे. त्यात चालकाने काही चुकीच्या वस्तूंचे सेवन केले होते का, ही बाब स्पष्ट होणार असल्याचेही भिमनवार यांनी सांगितले.

प्रकरण काय?

गोंदियाच्या दिशेने जात असताना शिवशाही बस (क्रमांक एम.एच.-०९, ई एम १२७३)च्या चालकाने दुचाकीच्या पुढे जाण्यासाठी बसचा वेग वाढवला. या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस उलटली. या घटनेत ११ प्रवाश्यांचा मृत्यू तर २८ प्रवासी जखमी झाले. घटनेनंतर एसटी महामंडळ, आरटीओ, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत दगावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली होती. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दगावलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपये तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ लाख मदतीची घोषणाही केली.

हेही वाचा : अमरावती: दोन कार समोरास

एसटी महामंडळाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह

एसटी महामंडळाच्या शिवशाही बसच्या अपघातामुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षीत प्रवासाच्या दाव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान राज्यात एसटी महामंडळातील एकूण बस अपघाताच्या प्रमाणाच्या तुलनेत शिवशाही बसच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महामंडळ अपघात टाळण्यासाठी काय उपाय करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.