गोंदिया:- अतिरिक्त गर्दी लक्षात घेता , सामान्य वर्गातील प्रवाशांसाठी, रेल्वे तर्फे भिवंडी-संकरेल- खडकपूर आणि खडकपूर -ठाणे दरम्यान ३ (समर स्पेशल ) उन्हाळी विशेष ट्रेन चालवली जात आहे. ट्रेन भिवंडी-संकरेल- खडकपूर साप्ताहिक उन्हाळी विशेष ट्रेन भिवंडी येथून दर बुधवारी २३ एप्रिल पर्यंत धावेल. त्याच प्रमाणे खडकपूर- ठाणे साप्ताहिक उन्हाळी विशेष ट्रेन १२ ते २६ एप्रिल दरम्यान दर शनिवारी खडकपूर येथून धावेल. ही गाडी गोंदिया, रायपूर आणि बिलासपूर स्थानकावर थांबेल.

या ट्रेनमध्ये प्रवाशांना भिवंडी-खडकपूर दरम्यानच्या सर्व जलदगतीच्या थांब्यांवर प्रवास करता येणार आहे. या उन्हाळी विशेष ट्रेनमध्ये दोन एलएसआरडी , १० जनरल, १० पार्सल यान सह एकूण २२ डबे असतील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने अधिकृत केलेल्या रेल्वे चौकशी सेवे कडून ट्रेन ची नेमकी स्थिती जाणून घेऊनच प्रवास सुरू करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या विशेष गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांबद्दल तपशीलवार माहितीसाठी, तुम्ही एनटीइएस ॲप डाउनलोड करून माहिती घेऊ शकता.

काही रद्द केलेल्या गाड्या… वळवलेल्या मार्गांवर धावतील…

ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा रोड रेल्वे विभागांतर्गत मेरामंडली-हिंदौल रोड रेल्वे मार्गाला मेरामंडली स्टेशन ला जोडण्याचे काम ब्लॉक घेऊन केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्याची घोषणा या पूर्वी करण्यात आली होती. मात्र आता तापमान सातत्याने वाढत असून उन्हाळ्याचे दिवसा मुळे प्रवाशांची सोय लक्षात घेऊन काही मोजक्याच पॅसेंजर गाड्या पूर्ववत करून त्या बदललेल्या मार्गावर धावणार आहेत. यातील बहुतांश गाड्या गोंदिया रेल्वे स्थानकावरून जातात. यात गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस १८ एप्रिल २०२५ रोजी गांधीधाम हून सुटणारी गाडी लखौली, टिटलागड, रायगड, विजयनगरम, ब्रह्मपूर, खुर्दा रोड मार्गे वळवलेल्या मार्गाने पुरी स्थानका ला जाईल. तसेच पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस २१ एप्रिल रोजी पुरी हून सुटणारी एक्सप्रेस वळवलेल्या मार्गाने खुर्द रोड, ब्रह्मपूर, विजयनगरम, रायगड, टिटलागड, लखौली मार्गे गांधीधाम ला जाईल. इंदूर-पुरी हमसफर एक्सप्रेस १५ आणि २२ एप्रिल २०२५ रोजी इंदूर हून सुटेल आणि बदललेल्या मार्गाने झारसुगुडा रोड, संबलपूर, बालंगीर, टिटलागढ, विजयनगरम, खुर्दा रोड मार्गे पुरीला जाईल.

तर पुरी-इंदोरा हमसफर एक्स्प्रेस, १७ आणि २४ एप्रिल २०२५ रोजी पुरी हून सुटणारी, खुर्दा रोड, विजयनगरम, टिटलागढ, बालंगीर, संबलपूर, झारसुगुडा रोड मार्गे इंदूरला जाईल अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांनी पत्रका द्वारे दिली आहे.