लोकसत्ता टीम
अमरावती : विदर्भ पंढरी अशी ओळख असलेल्या शेगाव येथे संत गजाजन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून दोन एक्स्प्रेस गाड्यांना शेगाव रेल्वे स्थानकावर २८ ऑगस्टपासून थांबा देण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, अजमेर पुरी एक्स्प्रेस (२०८२३ /२०८२४) दिनांक २८ ऑगस्टपासून शेगाव स्थानकावर थांबणार आहे. याशिवाय गाडी क्रमांक १२४८५/१२४८६ नांदेड- श्री गंगानगर एक्स्प्रेसला देखील २८ ऑगस्टपासून शेगाव स्थानकावर थांबा असणार आहे.
आणखी वाचा-“मोदी सरकारच्या कामगिरीमुळे शरद पवारांचेही मतपरिवर्तन होईल”, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
पुरी-अजमेर ही द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस २८ ऑगस्टला रात्री शेगाव स्थानकावर १०.०९ वाजता येईल आणि १०.१० वाजता सुटेल. अजमेर-पुरी एक्स्प्रेस २९ ऑगस्टला दुपारी ३.३४ वाजता येईल आणि ३.३५ ला सुटेल. नांदेड- श्री गंगानगर ही द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस २८ ऑगस्टला दुपारी ४.२९ वाजता शेगाव स्थानकावर पोहचेल आणि ४.३० वाजता सुटेल. श्री गंगानगर- नांदेड एक्स्प्रेस २९ ऑगस्टला दुपारी ४.०४ वाजता येईल आणि ४.०५ ला सुटेल.
याशिवाय १२८०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हावडा मेलला २६ ऑगस्टपासून जलंब स्थानकावर थांबा देण्यात आला असून ही गाडी पहाटे ५.४३ वाजता पोहचेल. तर १२८१० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल २६ ऑगस्टला सायंकाळी १९.१३ वाजता जलंब स्थानकावर पोहचेल. २०९२५ सुरत-अमरावती एक्स्प्रेस देखील जलंब स्थानकावर २७ ऑगस्टपासून थांबणार आहे. ही गाडी सायंकाळी ७.३३ वाजता पोहचेल, तर २०९२६ अमरावती-सुरत एक्स्प्रेस २८ ऑगस्टपासून ११.१३ वाजता जलंब स्थानकावर पोहचेल.