नागपूर : नागपूर येथून गोव्यासाठी एकमेव थेट रेल्वेगाडी आहे. या गाडीला प्रतिसाद बघता आणि नागपूर ते मडगाव या आठवड्यातून दोनदा धावणारी गाडीला जुलैपर्यंत चालवण्यात येणार आहे. नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष गाडी २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होती. आता ही गाडी ७ जून २०२३ पर्यंत धावणार आहेत. तसेच पुढे पावसाळ्याच्या वेळापत्रकानुसार १ जुलैपर्यंत ही गाडी सुरू राहणार आहे.

मडगाव-नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होती. ही गाडी आता ८ जून २०२३ पर्यंत धावणार आहे. तसेच पुढे पावसाळ्याच्या वेळापत्राकानुसार २ जुलैपर्यंत ही गाडी सुरू राहणार आहे. या गाड्यांचे थांबे आणि वेळेत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी बघता मध्य रेल्वेने नागपूर ते मनमाड गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितले.

Story img Loader