अकोला : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वेला मिळणारा वाढता प्रतिसाद व प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने दहा गाड्यांना कायमस्वरूपी अतिरिक्त ३४ डबे जोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांच्या हितासाठी मध्य रेल्वेने १२ ऑक्टोबरपासून पुढे वातानुकूलित आणि सामान्य डबे असलेल्या १० गाड्यांमध्ये एकूण ३४ डब्बे कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये २२१३९ पुणे-अजनी एक्सप्रेस, २२१४० अजनी-पुणे एक्सप्रेस, २२१४१ पुणे-नागपूर एक्सप्रेस, २२१४२ नागपूर-पुणे एक्सप्रेस या गाड्यांमध्ये एलएचबी प्रत्येकी पाच डबे, ११०४५ कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेस, ११०४६ धनबाद कोल्हापूर एक्सप्रेस प्रत्येकी एक आयसीएफ डबे, ०१०२७ एलटीटी-बल्लारशाह एक्सप्रेस, ०१०२८ बल्लारशाह एलटीटी एक्सप्रेस प्रत्येकी चार आयसीएफ डबे, ०११३९ नागपूर- मडगाव एक्सप्रेस, ०११४० मडगाव नागपूर एक्सप्रेसला प्रत्येकी दोन आयसीएफ डबे जोडले जाणार आहेत.