नागपूर: अशोक ले- लँड आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून (१६ सप्टेंबर) ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत ‘डबल डेकर’ इलेक्ट्रीक बस (ग्रीन बस) येत आहे. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या बसचे लोकार्पण त्यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थान परिसरात होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ता मेघे राहतील. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांच्या नि:शुल्क धार्मिक स्थळ तसेच पर्यटनस्थळांच्या सहलीसाठी या डबल डेकर ग्रीन बसचा उपयोग केला जाणार आहे. सद्यस्थितीत प्रतिष्ठानकडे ग्रीन बस असून त्याव्दारे पाच वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांना निशुल्क सहल घडवून आणली जाते. शेगाव, माहूर, कळंब, आंभोरा, आदासा, धापेवाडा आदी धार्मिक स्थळांच्या निःशुल्क सहलीचा हजारो ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून या दोन्ही बसेस ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानला मिळाल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा यांनी दिली. तर लोकार्पण कार्यक्रमाला प्रामुख्याने स्विच मोबिलिटीचे सीईओ महेश बाबू, अशोक ले- लँड लिमिटेडचे उपाध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स) यश सच्चर, पश्चिम व मध्य झोनचे प्रमुख ए. के. सिन्हा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि इतरही नेते उपस्थित राहतील.

हेही वाचा – आश्चर्य! जिल्ह्यात कांदा उत्पादन नाही, तरीही ६७६ शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे दोन कोटी तीस लाख रुपये जमा…

हेही वाचा – शरणार्थी ११०३ तिबेटी बांधवांना आपल्या देशात जाण्याची ओढ, ७२ वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यात आश्रय

‘डबल डेकर’ ग्रीन बसचे वैशिष्टे

अशोक ले-लँड कंपनीची ही डबल डेकर ग्रीन बस वातानुकुलित असून यात ६५ प्रवाशांची बसण्याची व्यवस्था आहे. अ‍ॅडव्हान्स लिथियन-आयर्न बॅटरीवर चालणारी ही बस दीड ते तीन तासांच्या एका चार्जिंगमध्ये २५० किमी धावू शकते. या डबल डेकर बसची उंची ४.७५ मीटर असून लांबी ९.८ मीटर आणि रुंदी २.६ मीटर आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good news for senior citizens of nagpur double decker green bus for travel mnb 82 ssb