नागपूर : उन्हाळ्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी आणि विवाह समारंभ यामुळे या काळात प्रवाशांची संख्या अनेक पटीने वाढते आणि नियमित रेल्वेगाड्यांवर भार वाढतो. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणे कठीण होऊन जाते. यातून रेल्वेने मार्ग काढत काही मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त आजपर्यंत २७८ अनारक्षित गाड्यांसह १०५८ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
मध्य रेल्वेने यापूर्वी उन्हाळी विशेष गाड्यांच्या ९८६ सेवांची घोषणा केली होती आणि आता प्रवाशांच्या हितासाठी ७२ अतिरिक्त सेवा चालवणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – रक्सौल साप्ताहिक विशेष गाडी १० एप्रिल ते २६ जून पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी ७.५५ वाजता सुटेल आणि रक्सौल येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.५० वाजता पोहचेल.
रक्सौल- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड्या ८ एप्रिल ते २४ जूनपर्यंत दर मंगळवारी रक्सौल येथून सायकंळी ७.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ५.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- सहरसा विशेष गाडी १३ एप्रिल ते २९ जून पर्यंत दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दुपारी ४.३५ वाजता सुटेल आणि सहरसा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ९.०० वाजता पोहोचेल.
सहरसा- लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई विशेष गाडी ११ एप्रिल ते २७ जूनपर्यंत दर शुक्रवारी सहरसा येथून सायंकाळी ५.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- धनबाद विशेष गाडी १० एप्रिल ते २६ जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सायंकाळी ५ वाजता सुटेल आणि धनबाद येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पोहोचेल.
धनबाद- लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई विशेष गाजी ८ एप्रिल ते २४ जूनपर्यंत दर मंगळवारी धनबाद येथून रात्री ११ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजता पोहोचेल.
या गाडीला कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खंडवा, इटारसी जंक्शन, पिपरिया, मदन महल, कटनी साउथ, ब्योहारी, बरगवाँ, सिंगरौली, चोपन, रेणुकूट, गढ़वा रोड, डालटनगंज, लातेहार, खलारी, पतरातू, बरकाकाना, बोकारो थर्मल, चन्द्रपुरा आणि कतरासगड येथे थांबे देण्यात आले आहेत.