बुलढाणा: मलकापूर नजीकच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा पकडला आहे. या साठ्याची किंमत ७० लाख असून कारवाईत १ कोटी ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राष्ट्रीय महामार्ग सहा वर असलेल्या खालसा ढाबा येथे गुटखा साठा असलेले कंटेनर असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी देवराम गवळी यांना मिळाली. यावर त्यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले.
नागालँड राज्याचे ‘पासींग’ असलेल्या या वाहनातून लाखोंचा गुटखा आढळून आला. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक अशोक थोरात,यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर उप विभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी, मलकापूर ठाणेदार अशोक रत्नपारखी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.