नागपूर : देशात पहिल्यांदा भटके-विमुक्त-आदिवासी-बहुजनांची फौज उभारून इंग्रजांना २२ वेळा युद्धात हरवणारे राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील किल्ले वाफगाव आहे. महाराष्ट्रात श्रीमंत मल्हारराव होळकरांनी बांधलेला एकमेव भुईकोट किल्ला शिल्लक आहे. ही पवित्र वास्तू देशातील धनगर व समस्त बहुजन आठरापगड बांधवांचे श्रद्धास्थान आहे.

बहुजनांच्या पराक्रमी इतिहासाची प्रस्थापितांच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सत्तेत कायम हेळसांड झाली. आता मात्र वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यावा व  तिथे होळकरशाहीच्या इतिहासाचे संवर्धन व जतन करावे, यासाठी आम्ही सरकारकडे वारंवार मागणी केली आहे. सध्या महायुती सरकारच्या काळात काही सकारात्मक बाबी होत आहेत. पण ही वास्तू रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे, असे असताना किल्ले वाफगावच्या विकासासाठी स्थानिक जिल्हाप्रशासानाकडून १० कोटीचा निधी देणे म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या पथ्यावरच हा निधी पडेल, अशी भिती धनगर बांधवांना आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”

हेही वाचा >>>“मराठा-ओबीसी वादामुळे अशांतता ,५० हजारांहून अधिक उद्योग ” काय म्हणाले पटोले

कदाचित सरकारचा हेतू शुद्ध असला तरी मुळ मागणीला खोडा  घालणारा आहे, हे सरकारने कृपया लक्षात घ्यावे. त्यामुळे ज्याप्रमाणे किल्ले रायगडसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून शेकडो कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे, त्याच धर्तीवर आपण किल्ले वाफगावचा विकास करावा. किल्ले वाफगाव विकास प्राधिकरण स्थापन करावे, समग्र विकास आराखडा साजर करावा. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा शेकडो कोटींचा निधी देण्यात यावा. याची घोषणा करून येत्या ६ जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपचे विधान परिषद सदस्य गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.

सरकारला शक्य नसल्यास आम्हा धनगर-बहुजन बांधवास परवानगी द्यावी की आम्ही स्वतः आमच्या राजराजेश्वर यशवंतराव होळकरांच्या किल्ले वाफगावचा भव्यदिव्य स्वरूपात लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करू, अशी विनंतीही पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.