नागपूर : महिलांच्या किटी पार्टीत आयोजक महिलांनी काही ‘जिगोलो’ युवकांना बोलावले. तेथून संपर्कात आलेल्या एका जिगोलोला एक महिला वारंवार नागपुरात बोलवत होती. पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ती थेट मोठ्या हॉटेलमध्ये त्या युवकासोबत रात्र घालवत होती. मात्र, पतीला संशय आल्यामुळे पत्नीचे बींग फुटले. हॉटेलमध्ये जिगोलोसोबत नको त्या अवस्थेत पत्नी आढळून आली. या घटनेची पोलिसांत जरी तक्रार नसली तरी शहरभर मोठी चर्चा आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाहतूकदार असलेल्या युवकाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. त्यातून त्याला सुबत्ता आली. त्याने स्वत:साठी आणि पत्नीसाठी स्वतंत्र कार घेतल्या. उच्चशिक्षित असलेल्या पत्नीला महिलांच्या किटी पार्टीत आणि मैत्रिणींनी आयोजित केलेल्या पार्टीत वारंवार जाण्याची सवय होती. दुसरीकडे पती सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत कामात व्यस्त राहत होता.  काही महिन्यांपूर्वी त्या महिलेच्या मैत्रिणींनी वर्धा रोडवरील एका मोठ्या हॉटेलमध्ये किटी पार्टी आणि स्नेहमिलन आयोजित केले. रात्रभर चालणाऱ्या पार्टीत ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’ पुरविणाऱ्या कंपनीकडून काही ‘जिगोलो’ (पुरुष वेश्या) बोलावण्यात आले होते. पार्टी संपल्यानंतर दिल्लीतील  एका ‘जिगोलो’ युवकाचा मोबाईल क्रमांक महिलेने घेतला. काही दिवसांनंतर तिने त्याला  फोन केला. ‘स्पेशल सर्व्हिस’ म्हणून विमानाचे तिकिट आणि मोबदला म्हणून १ लाख रुपये त्या युवकाने मागितले. महिलेने सर्व अटी मान्य करीत पैसेही दिले. तेव्हापासून ही महिला त्या युवकाला पैसे देऊन दिल्लीवरुन नागपुरात बोलवित होती. अनेकदा तो युवक नागपुरात येऊन गेला. दोघेही रात्रभर महागड्या हॉटेलमध्ये वेळ घालवत होते. पहाटेच्या सुमारास महिला घरी परत येत होती.

हेही वाचा >>>एसटीच्या मोकळ्या जागा विकासकाच्या घशात… संघटना म्हणते धर्मादाय संस्था…

पतीला जेवनातून झोपेच्या गोळ्या

दर महिन्याला त्या युवकासोबत रात्र घालविता यावी, यासाठी महिला पतीला जेवनातून झोपेच्या गोळ्या देत होती. तो झोपल्यानंतर बाहेरुन दार लावून ती कारने  वर्धा रोडवरील हॉटेलमध्ये जात होती. तेथे त्या युवकासोबत रात्र घालवायची. पहाटे  घरी परत येत होती. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु होता.

हेही वाचा >>>नक्षलवाद्यांच्या आणखी एका मोठ्या नेत्याला कंठस्नान, मिलिंद तेलतुंबडेनंतर…

असा झाला उलगडा

 काही दिवसांपासून पत्नीच्या वागण्यावर पतीला संशय आला. त्याने पत्नी कुठे कुठे जाते, याची माहिती घेण्यासाठी कारमध्ये जीपीसी प्रणाली लावली. महिलेने दिल्लीवरुन ‘जिगोलो’ युवकाला बोलावले. रात्री पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि मुलीला बाजुच्या रुममध्ये झोपवले. कारने थेट हॉटेल गाठले. मुलीची प्रकृती बिघडल्याने ती रात्री एक वाजता  उठली. आई न दिसल्यामुळे तिने वडिलांना उठवले. पत्नी बेपत्ता असल्यामुळे त्याने कारचे लोकेशन तपासले. कार एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये असल्याची माहिती मिळाली. तो भावाला घेऊन त्या हॉटेलमध्ये गेला. तेथे पत्नीच्या नावाने बुक असलेली खोली उघडायला लावली असता पत्नी एका युवकासोबत नको त्या अवस्थेत आढळून आली. त्याने दोघांनीही तेथे मारहाण केली.  प्रकरण पोलिसांत गेले. मात्र, बदनामीच्या भीतीने पतीने  तक्रार केली नाही. त्याने पत्नीला लगेच माहेरी पाठविले आणि तिच्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची सध्या शहरभर चर्चा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gossip of an extramarital affair case of elite class in nagpur city adk 83 amy