नागपूर : महाराष्ट्रात सरकार गेले ते केवळ उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागण्यामुळे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने बावनकुळे नागपुरात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय जनता पक्षाला कुठलेही सरकार पाडण्याची गरज पडली नाही. पक्षाचे केंद्रीय नेतृत्व लोकशाही मानणारे आहे. ठाकरे यांनी आमदारांना वाईट वागणूक दिल्याने आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळे आमदारांनी त्यांना सोडले. आमदारांनी आपल्या अस्तित्वासाठी नवे सरकार बनवले. उद्धव ठाकरे यांनी खरे तर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

हेही वाचा >>> “पटोले यांची कार्यपद्धती हिंदुत्ववादी विचारांची…”, काँग्रेस नेत्यांची खरगे यांच्याकडे तक्रार

अजूनही उरलेले आमदार जाऊ नये यासाठी रोजचा सकाळचा भोंगा (संजय राऊत यांना उद्देशुन) बंद करावा तरच जी सेना राहिली आहे ती राहील असेही बावनकुळे म्हणाले. कसबाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट प्रचाराला आले त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांकडून त्याचे आभार मानतो. पक्षनिष्ठा काय असते हे गिरीश बापट यांच्यापासून शिकावे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असेही बावनकुळे म्हणाले.