शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून संपाची हाक दिली. चर्चा निष्फळ ठरल्याने उद्यापासून संप अटळ असल्याने दहावी व बारावीच्या परीक्षेचे कसे होणार, हा मोठा प्रश्न आ वासून उभा झाला. मात्र, तो सुटल्याने शिक्षणाधिकारी कार्यालयाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
परीक्षा संचालित करणारे शिक्षक व मुख्याध्यापक संपात सहभागी आहेत. मात्र परीक्षेचे सूत्र सांभाळणारे केंद्रप्रमुख व पर्यवेक्षक शिक्षकांनी परीक्षेवर बहिष्कार न टाकण्याची भूमिका घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>‘पैसे दे नाहीतर बायकोला विक’; देसाईगंजमधील सावकाराच्या ऑडियो क्लिपने खळबळ

संपात सहभागी म्हणून त्यांची कागदोपत्री नोंद राहणार असली तरी प्रत्यक्षात ते केंद्रावर हजर राहणार आहेत. १४ मार्चला परीक्षार्थी तुलनेने कमी आहेत. मात्र १५ मार्चला गणिताचा पेपर असल्याने त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात राहणार आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली. शिक्षक संपावर जाणार म्हणून अन्य मनुष्यबळ शोधण्याची आपत्ती शिक्षणाधिकारी कार्यालयावर आली नाही.