नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएच.डी. संशोधकांना अधिछात्रवृत्तीतून अर्थसहाय्य केले जाते. या क्रमात आता महाज्योतीच्या संचालक मंडळाने पीएच.डी. संशोधकांच्या अर्थसहाय्य योजनेत वाढ केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) अधिछात्रवृत्तीची नवीन रक्कम ठरवण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवीन निर्णयानुसार, ज्युनिअर रिसर्च फेलोशिपमध्ये (जेआरएफ) आता ३७ हजार रुपये व सिनियर रिसर्च फेलोशिपकरिता (एसआरएफ) ४२ हजार रुपये प्रतिमाह अधिछात्रवृत्तीची रक्कम व यासोबतच घरभाडे भत्ता ३० टक्के, २० टक्के व १० टक्के देण्यात येणार असल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

हेही वाचा >>>हिंदूंना एकत्र करण्यासाठी RSS ला प्रकाश आंबेडकरांचा महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

याआधी २ वर्षे जेआरएफसाठी ३१ हजार प्रतिमाह, एसआरएफ करिता उर्वरित ३ वर्षांसाठी ३५ हजार प्रतिमाह अर्थसहाय्य देण्यात येत होते. तसेच घरभाडे भत्ता २४ टक्के, १८ टक्के व ८ टक्के इतका होता. आता यूजीसीने यात वाढ केली आहे. त्याच आधारावर महाज्योतीनेही पीएचडी अर्थसहाय्य योजनेत वाढ केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता प्रदान करण्यात आली.