वर्धा : संपाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यव्यवस्था कोलमडू नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे. सेवाग्रामचे कस्तुरबा रुग्णालय व सावंगीचे विनोबा भावे रुग्णालय दिमतीला घेत प्रशासनाने संपकर्त्यांना चोख उत्तर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर यांच्याकडून आरोग्य विषयक कारभाराचा आढावा घेताना संप लांबल्यास काय करता येईल याबाबत चर्चा केली. आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने रुग्णांची गैरसोय होऊ न देण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.

हेही वाचा >>> अकोला : उच्चशिक्षित विवाहितेने अभियंता पतीला सोडून धरला प्रियकराचा हात; १४ महिन्यांच्या चिमुकलीचाही केला नाही विचार

Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल

फारसा फरक पडला नसल्याचे दिसून आले. खासगी रुग्णालयांनाही सतर्क करण्याची सूचना झाली. सावंगीचे डॉ. उदय मेघे व डॉ. अभय गायधने यांनी सर्व ती तयारी असल्याचे स्पष्ट केले. तसेच सेवाग्रामच्या डॉ. पूनम वर्मा यांनीही समर्थ असल्याचे स्पष्ट केल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. संप लांबल्यास संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे ठरले. शासकीय आरोग्य केंद्रांना काही तुटवडा भासल्यास सेवाग्राम व सावंगीचे वैद्यकीय मनुष्यबळ तत्पर असल्याची खात्री मिळाली. जिल्हाधिकारी कर्डीले यांनी यासोबतच दोन्ही रुग्णालयास जिल्हाभर आरोग्य शिबिरे घेण्याची सूचना केली. एकूणच संपावर योग्य तो तोडगा तयार ठेवण्यात प्रशासन हालचाल करीत असल्याची घडामोड आहे.