वर्धा : संपाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यव्यवस्था कोलमडू नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे. सेवाग्रामचे कस्तुरबा रुग्णालय व सावंगीचे विनोबा भावे रुग्णालय दिमतीला घेत प्रशासनाने संपकर्त्यांना चोख उत्तर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर यांच्याकडून आरोग्य विषयक कारभाराचा आढावा घेताना संप लांबल्यास काय करता येईल याबाबत चर्चा केली. आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने रुग्णांची गैरसोय होऊ न देण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in