देशभरातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच अनेक प्रकल्पांना लेटमार्क लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. सरकारच्या हस्तक्षेपावरून त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. नागपूरच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले की, “गॉड आणि गर्व्हनमेंटवर आपल्या सगळ्यांचा विश्वास असतो. सरकारचा हस्तक्षेप, सरकारचा सहभाग किंवा सरकारची छाया देखील ज्या प्रकल्पावर पडते तो प्रकल्प नष्ट होतो, या थेअरीचा मी समर्थक आहे. सरकार म्हणजे विषकन्येसारखं असतं. सरकारपासून जो दूर राहील तो प्रगती करू शकेल.” सरकारच्या हस्तक्षेपावर नितीन गडकरी यांनी थेट भाष्य केल्याने यावरून आता पुन्हा राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

dharavi re devlopment ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
धारावीत लवकरच पाच नमुना सदनिका; पात्र रहिवाशांसह अपात्र, पात्र लाभार्थींना घरांविषयी माहिती
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Digital Revolution in Indian Agriculture
विश्लेषण : कृषी क्षेत्रातही होणार डिजिटल क्रांती? काय आहेत केंद्र सरकारच्या योजना?
agricultural schemes
कृषिक्षेत्रासाठी १४ हजार कोटींच्या खर्चास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
पुणे: एमपीएससीच्या स्वायत्ततेतील हस्तक्षेपावर सतेज पाटील यांची टीका, म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ…’
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
Devendra fadnavis latest marathi news
‘झोपु’ योजनांमुळे केंद्र सरकारची शेकडो एकर जमीन लवकरच खुली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा; नव्या गृहनिर्माण धोरणाचे संकेत
Pointing out lack of coordination in development system Nitin Gadkari reprimanded officials
विकास यंत्रणातील असमन्वयाकडे लक्ष वेधत गडकरी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

गडकरींना खंडणी मागणारा सूत्रधार अखेर सापडला

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींच्या खंडणी मागून बॉम्बस्फोटमध्ये उडविण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याचा सूत्रधार लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव अफसर पाशा याला नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला नागपुरात आणले असून त्याची आणि जयेश पुजारी याची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. 

हेही वाचा >> गडकरींना खंडणी मागणारा सूत्रधार अखेर गवसलाच; दहशतवादी अफसर पाशा नागपूर पोलिसांच्या ताब्यात

२१ मार्चला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालात बेळगाव कारागृहातून जयेश पुजारी याने तीन फोन केले व  १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोटात उडविण्याची धमकी दिली. या प्रकरणात पहिल्यांदा बेळगाव कारागृहातून जयेश पुजारी याला नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर युएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.