नागपूर : राज्यभरात सध्या विविध विभागांमध्ये पदभरती सुरू आहे. त्यामध्ये एमपीएससीकडून विविध परीक्षा आयोजित केल्या जात आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, महिला व बाल विकास विभाग गट क सरळसेवा भरती २०२४ आणि समाज कल्याण विभाग भरती २०२४ येथे विविध पदांसाठी भरती सुरू आहे. सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. गट ब च्या ४८० तर गट- क च्या १३३३ पदांसाठी जाहिरात आली आहे. आचारसंहित लागण्यापूर्वी ही जाहिरात आली आहे. यासाठी अर्ज करण्यास काहीच दिवसांचा कालावधी उरला आहे. या परीक्षांबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यार्थ्यांची काय मागणी होती?

‘एमपीएससी’च्या वतीने राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा दरवर्षी घेतली जाते. संयुक्त परीक्षेसाठी मागील वर्षी सात हजारांवर जागांसाठी जाहिरात आली होती. एप्रिल २०२३ मध्ये परीक्षाही घेण्यात आली. यावर्षीही जवळपास आठ हजार जागांसाठी जाहिरात येईल या अपेक्षेने राज्याच्या अनेक भागातील विद्यार्थी पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये परीक्षेची तयारी करीत आहेत. यासाठीचा मोठा आर्थिक भार त्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आचारसंहिता जाहीर होण्याआधी जाहिरात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांची होती. अखेर गट – बच्या ४८० आणि गट- क च्या १३३३ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली.

हेही वाचा…प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर

अशी आहे गट ब पदांची विभागणी

महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही ५ जानेवारी २०२५ ला होणार आहे. ४८० पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. बहूप्रतिक्षित अशा पोलीस उपनिरीक्षक पदांचा यामध्ये समावेश आहे. यात सहायक कक्ष अधिकारी पदासाठी ५४, राज्य कर निरीक्षक २०९ आणि पोलीस उपनिरीक्षक २१६ पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा…रश्मी शुक्ला यांची संघ मुख्यालयाला भेट आणि पटोले यांची आयोगाकडे तक्रार

समाजकल्याण विभाग भरती २०२४

अर्ज भरण्यास सुरुवात – १० ऑक्टोबर २०२४
अर्ज करण्यासाठीची शेवटची मुदत- ११ नोव्हेंबर २०२४

महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती २०२४

अर्ज करण्यास सुरूवात- १४ ऑक्टोबर २०२४
अर्ज भरायची शेवटची तारीख- १० नोव्हेंबर २०२४

महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२४

अर्जप्रक्रिया सुरू- १४ ऑक्टोबर २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०४ नोव्हेंबर २०२४

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४

अर्ज करण्यास सुरुवात- १४ ऑक्टोबर २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०४ नोव्हेंबर २०२४

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government job opportunity mpsc conducted various exams dag 87 sud 02