वर्धा : पैसे घेऊन चुकलेला चूक झाल्यास पैसे परत करेल, याची खात्री नसल्याचा अनुभव अनेकांनी घेतल्याचे चित्र साधारण आहे. पण एकाची खात्री मात्र दिल्या जाते. शासनाने घेतलेल्या पैशाचा रेकॉर्ड असतो. म्हणून चूक घेतलेले पैसे चुकीने, असे दिसून आल्यास शासनास पैसे परत करावे लागतात.असेच हे उदाहरण. राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद अर्थात नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स या संस्थेतर्फे एक अभ्यासक्रम पुरुस्कृत होता. तो म्हणजे चार वर्षीय बी. ए. / बिएस्सी बिएड ( एकात्मिक ). आता तो बंद करण्यात आला. त्या ऐवजी चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम सूरू करण्यात आला आहे. हा बदल झाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २०२५ – २६ पासून चार वर्षाच्या बीए / बीएससी बीएड अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आणि केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येवू नये असे स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या निर्णयामुळे २०२५ – २६ या वर्षासाठी असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांना या शुल्कपोटी भरलेली रक्कम परत मिळेल. तशी सूचना स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जाणार असल्याचे सीईटी सेलकडून कळविण्यात आले आहे. तसेच २५ – २६ या सत्रासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत आयोजित चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा या साठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सूचना करण्यात आली आहे.

हा चार वर्षीय बीए / बीएस्सी बी एड एकात्मिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांना चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण हा अभ्यासक्रम परावर्तीत होत असल्याबद्दल राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेकडून कळविण्यात आले आहे. परिणामी एकात्मिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांना नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स कडे एकात्मिक शिक्षक प्रशिक्षक अभ्यासक्रम या साठी अर्ज करण्याचे सूचित करण्यात आले आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद म्हणजेच नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स ही राष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्था शिक्षक प्रशिक्षण व अभ्यासक्रम याबाबत पुढाकार घेत असते. त्यांनी अभ्यासक्रम बदलला. नवा सूरू केला. पण जुन्याच अभ्यासक्रम प्रवेशाचे शुल्क आकारून चुकले. नवा सूरू केला. म्हणून जुन्या अभ्यासक्रमाचे शुल्क परत करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. हे शुल्क कसे परत मिळणार, हे लवकरच स्पष्ट होईल.