नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेतून पात्र महिला लार्भार्थीला दर महिन्याला १५०० रुपये शासन देणार आहे. ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल असे या योजनेचे वर्णन सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या समित्यांवर एकही महिलेची नियुक्ती करण्यात आली नाही. सर्व नियुक्त्या या पुरूषांच्या आहेत. त्यामुळे शासनाचे महिला प्रेम बेगडी आहे, अशी टीका होऊ लागली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासनाने जुलै महिन्यात जाहीर केली. तेव्हापासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाखो महिलांनी अर्ज केले. या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र ठरलेल्या महिला लाभार्थीला १५०० रुपये मानधन दर महिन्याला देण्यात येणार आहे. अर्जाच्या छाननीसाठी समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांवर एकाही महिलेची नियुक्ती करण्यात आली नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे सरकारला बहिणीऐवजी भाऊच अधिक लाडका असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूर ग्रामीणमध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. या समित्या मतदारसंघनिहाय स्थापन करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील सर्व सहाही मतदारसंघाच्या समित्या स्थापन करण्यात आल्या. यापैकी एकाही समितीवर महिला नाही. सर्वच ठिकाणी पुरूषांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष

हे ही वाचा…बुलढाणा : छळाची हद्द! अघोरी विद्या, अश्लील चित्रफीत, पाण्यात ‘करंट’ अन्…

रामटेक विधानसभा मतदारसंघाच्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार आशीष जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामठी मतदारसंघाच्या समितीचे अध्यक्षपदही तेथील आमदार टेकचंद सावरकर यांच्याकडे आहे. हिंगणा मतदारसंघात या भागाचे आमदार समीर मेघे यांचे कट्टर समर्थक बबलू गौतम यांची हिंगणा मतदारसंघाच्या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. उमरेड मतदारसंघात आमदाराचे पद रिक्त आहे. येथे भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावनेरमध्ये मनोहर कंभाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाही ठिकाणी महिलेला संधी देण्यात आली नाही.

हे ही वाचा…नागपूर हिट अँन्ड रन प्रकरणावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ” पोलिसांकडे…”

महिलांमध्ये नाराजी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सरकारने याचे श्रेय घेण्यासाठी विभागपातळीवर महिलांचे मेळावे घेतले व त्यांना सरकार तुमची किती काळजी घेते हे सांगितले. या योजनामुळे राजकीय पक्षातील महिलांचा उत्साह वाढला होता. त्यानाही राजकारणात मानाचे स्थान मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. परतु अजूनही त्यांना समान संधी दिली जात नाही, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. या समित्यांवर त्यांची नियुक्ती न झाल्याने नाराजी आहे.