वर्धा : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे मंजूर झाले. मात्र जागेचा मोठा तिढा उद्भवला होता. त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी आदेश काढून निर्णय दिला. त्यानुसार १०० प्रवेश क्षमतेचे व ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील कृषी खात्याच्या जागेवर स्थापन होणार. जागेचा मोठा वाद झाल्यावर तज्ञ् समिती स्थापन करण्यात आली हाती. समितीने हिंगणघाट तालुक्यातील काही जागा तसेच समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील शासकीय जागा तपासल्या. नंतर अहवाल दिला. त्यानुसार जाम येथील कृषी खात्याच्या ४० एकर जागेवर समितीने शिक्कामोर्तब केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागेचा वाद उफाळणार

हे महाविद्यालय हिंगणघाट येथे मंजूर झाले होते. पण आरोग्य व्यवस्थापन डोळ्यापुढे ठेवून निर्णय होणार होता. आता आदेशात हिंगणघाट ऐवजी समुद्रपूर तालुक्यात जाम येथे मंजूर करण्यात आल्याचे नमूद आहे. भाजपसोडून सर्व राजकीय पक्ष तसेच संघर्ष समितीने शासकीय जागेवर महाविद्यालय व्हावे म्हणून मुद्दा रेटला. पुढे समुद्रपूर येथील जागापाहणी झाल्यावर राजकीय बाब पुढे आली. आमदारकीचा सवाल म्हणून समुद्रपूरचा हट्ट काहींनी सोडून दिला. आता केवळ संघर्ष समिती हिंगणघाट साठी आग्रही आहे.

हे ही वाचा…विधानसभा निवडणुकीत स्पर्धा परीक्षार्थींचा कौल, या पक्षाला मोठा धक्का…

न्यायालयात जाण्याची भाषा सूरू झाली आहे. तसेच आज शुक्रवारी पुढील आंदोलन ठरविण्यासाठी हिंगणघाट येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. तर जाम येथे स्थापन होत असल्यास वाईट काय, असे समुद्रपूर समर्थक विचारत असून आतापर्यंत ५० किलोमीटर दूर जात होतोच. आता ५ किलोमीटरवर वैद्यकीय सेवा उपलब्ध होत असल्याने त्याचे स्वागत करावे, असे म्हणतात.

हे ही वाचा…Bhagyashree Atram: “अजित पवारांनी मला ज्ञान देण्यापेक्षा…”, भाग्यश्री आत्राम यांचा जोरदार पलटवार; भाषणातून चौफेर टीका

आमदार समीर कुणावार म्हणतात..

वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत आग्रही पण नंतर खाजगी जागा सुचविल्याने वादच्या भोवऱ्यात सापडलेले आमदार समीर कुणावार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणतात आरोग्य तज्ञ्जांनी मान्य केलेली ही जागा असून तो राजकीय निर्णय मुळीच नाही. याचे सर्वांनी स्वागत करावे, अशी माझी विनंती आहे. वाद करून नुकसान करणे हिंगणघाटकरांच्या हिताचे नाही. या महाविद्यालयात २०२४ – २५ नव्हे तर २०२५ – २६ या सत्रात तरी प्रवेश सूरू होतीलच. तसा प्रयत्न करीत आहो. तात्पुरती व्यवस्था करून दिल्या जाईल. शासकीय जागा असावी हा सार्वत्रिक सूर शासनाने मान्य केला, त्याबद्दल आभारी आहोत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government medical college in the district approved at hinganghat in wardha pmd 64 sud 02