अकोला : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा सकारात्मक प्रसार करणे गरजेचे आहे. त्यातून पक्षाला संघटनात्मक बळकटी द्यावी, असा कानमंत्र भाजप प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना आज येथे दिला. ‘संघटन पर्व गाव वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत भाजपची पश्चिम विदर्भस्तरीय आढावा बैठक रविवारी अकोल्यात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीमध्ये पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्षांनी संघटनात्मक आढावा मांडला.

सरकारची कामगिरी खेड्या-पाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, असेआ. रवींद्र चव्हाण म्हणाले.आगामी काळामध्ये पक्षाने दिलेले प्रत्येक कार्यक्रम व संघटनात्मक विस्तार केला जाईल, असे आ. रणधीर सावरकर म्हणाले. सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी, तर आभार महानगराध्यक्ष जयंत मसने यांनी मानले

१५ मेपर्यंत विविध समित्या; तीन कोटी सदस्यांचे लक्ष्य विविध समित्या १५ मे पर्यंत गठीत होणार असून पक्षाने दिलेले कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. पक्ष विस्तारासाठी तीन कोटी सदस्य करण्याचे लक्ष्य घेऊन कामाला लागा, अशी सूचना आ. रवींद्र चव्हाण यांनी केली.