वर्धा : राज्यपालांच्या कार्यक्रमात शिष्टाचार पाळणे परवलीची बाब म्हटल्या जाते. मात्र, शनिवारी सायंकाळी चुकलेच. रोटरी या लब्धप्रतिष्ठित मंडळींच्या क्लबने राज्यपालांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र त्याकडे खासदार, आमदारांनी पाठ फिरविली. खासदार रामदास तडस यांना फोनद्वारे बोलाविण्यात आले. मात्र पत्रिकेत त्यांचा पाहुणे म्हणून साधा उल्लेख नव्हता. तर राज्यपालांच्या व्यासपीठावर माजी खासदार सुबोध मोहिते यांना स्थान मिळाले. अशावेळी माजी स्टेजवर तर आजी खासदार श्रोत्यात, हे कसं ? असा संतप्त सवाल खासदार समर्थक आता करीत आहे.
रोटरीला खासदारांकडून कामे करवून घ्यायला हवी. दिल्लीत आदरातिथ्य पण हवे. मात्र घरच्या कार्यक्रमात ते खासदारांना खाली बसविणार तर पैसेवाल्यांना मान देणार, हे कसे, अशी प्रतिक्रिया समर्थकांमध्ये उमटत आहे.
हेही वाचा – गोंदिया : तायक्वांदो स्पर्धेची वसुली पडली महागात, असोसिएशनवर बंदी
हेही वाचा – चंद्रपूर : जिल्हा बँकेच्या मेंडकी शाखेत १७ लाख ६७ हजारांची अफरातफर
रोटरी समन्वयक चंद्रेश मंडविया म्हणाले की, पत्रिकेत नाव नव्हते पण फोन करीत निमंत्रण दिले होते. त्यांना वेळ नसल्याचे कळले. अशा आयोजनाची माझी पहिलीच वेळ आहे. चुकल्यास दिलगिरी व्यक्त करतो. तर, दुसरीकडे खासदार तडस गोटात टोमणे मारल्या जात आहेत. रोटरीतर्फे २२ ते २५ दरम्यान भव्य आनंद मेळावा आयोजित आहे. यानंतर रोटरीचे पंचवीसवर बडे पदाधिकारी दिल्लीत खासदारांकडे पाहूनपणास जात आहेत. खासदार कार्यालयाने या पदाधिकाऱ्यांची यादी देत लोकसभा अध्यक्ष कार्यालयास संसद भवन पाहण्याची अनुमती मागितली आहे. म्हणजे, इकडे खासदार आदरवंचित तर तिकडे रोटरी सादर निमंत्रित, असा प्रकार असल्याचा टोमणा मारल्या जात आहे.