लोकसत्‍ता टीम

अमरावती: विभागातील काही जिल्‍ह्यांमध्‍ये शेतकऱ्यांचे प्रश्‍न गंभीर बनले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शेतकऱ्यांच्‍या आर्थिक विकासासाठी किमान दहा गावे दत्‍तक घ्‍यावीत आणि गाव परिवर्तन योजना राबवावी, असे आवाहन राज्‍यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी येथे केले.
पी.आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्‍या स्वामी विवेकानंद ऑडिटोरियममध्‍ये आयोजित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्‍या ३९ व्‍या दीक्षांत समारंभात ते अध्‍यक्षस्‍थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, श्री शिवाजी शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष हर्षवर्धन देशमुख आदी उपस्थित होते.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

रमेश बैस म्‍हणाले, विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या भागातील प्रत्‍यक्ष समस्‍यांचे आकलन होणे आवश्‍यक आहे. गाव परिवर्तन योजना राबविताना विद्यार्थ्‍यांना अधिकाधिक सहभाग घ्‍यावा, त्‍यामुळे त्‍यांच्‍या आकलनक्षमतेचा विस्‍तार होईल. त्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना विशिष्‍ट ‘क्रेडिट’ देखील प्रदान करण्‍यात यावे.
विद्यार्थ्यांचे चरित्र निर्माण, बुद्धीचा विकास व स्वतःच्या पायावर उभे करण्यास हातभार लावणारे शिक्षण देणे, हेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. नवीन शैक्षणिक धोरण अमरावती विद्यापीठामध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून लागू होणार आहे, ही आनंदाची बाब आहे, असे रमेश बैस म्‍हणाले.
ज्ञान हीच संपत्ती असून, ज्ञान चोरले जाऊ शकत नाही. राजांकडून जप्त केले जात नाही.

हेही वाचा… चंद्रपूर: जिल्हाधिकारी कार्यालय आता संपूर्ण ‘ई-प्रणालीवर’; १२ हजार ८४६ फाईल्स निकाली

भावांमध्ये त्याची विभागणी होत नाही, ते सोबतही घेऊन जाऊ शकत नाही. ज्ञान जेवढे खर्च करू तेवढे ते वाढत जाते, त्यामुळेच ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. शिक्षण जीवनभर चालणारी प्रक्रिया असून, आयुष्यभर शिकणारा विद्यार्थी बनले पाहिजे. शिक्षित लोकांना प्रशिक्षण दिल्यास ते क्रांतिकारी परिवर्तन करू शकतात. दीक्षांत समारंभात दिलेल्या पारितोषिक व पदव्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. अमरावती विद्यापीठ स्त्री सबलीकरणासाठी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल राज्यपालांनी कौतुक केले.

हेही वाचा… हे काय… पहिल्याच पावसात विमानतळावरील पीओपी पडले!

नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्‍य विकासावर भर देण्‍यात आला आहे. भारत हा तरूणांचा देश आहे. येथील कौशल्‍याकडे सर्व जगाच्‍या नजरा आहेत. विद्यार्थ्‍यांनी नोकरी मागणारे नव्‍हे, तर नोकरी देणारे बनावे, या दृष्‍टीने प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.

हेही वाचा… सोन्या- चांदीच्या दरात मोठी घसरण; पाहा आजचे भाव…

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्‍हणाले, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभ्यासक्रमांना पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत ‘सीबीसीएस’ (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम) लागू करण्यात आली आहे. विद्यापीठाचा यातील अनुभव अल्‍पकालीन असला, तरी नवीन शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीत त्‍याचा उपयोग होणार आहे. अभ्‍यासक्रमाची पुनर्रचना आणि गुणवत्‍ता वाढीसाठी विद्यापीठ सज्‍ज झाले आहे.

दीक्षांत समारंभाला उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्‍च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार असल्‍याचे सांगण्‍यात आले होते, पण दोघेही या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत.

Story img Loader