नागपूर: राज्यपाल रमेश बैस हे गुरूवार ७ ते १३ डिसेंबरपर्यंत विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे या काळात नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असणार आहे. सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ९ रोजी सकाळी ते भंडारा जिल्ह्यातील संरक्षण सेवा अकादमी, शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
शनिवार ९ डिसेंबरला अमरावती जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या राजमाता अहिल्याबाई स्त्री शक्ती पूरस्कार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी ३:३० वाजता अमरावती येथून वर्धाकडे प्रयाण करतील. वर्धा येथील विकास भवन, गांधी चौक येथे सायंकाळी ५ वाजता रोटरी क्लबच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. रविवार १० डिसेंबर रोजी राजभवन, नागपूर येथे राखीव.
हेही वाचा… एक कार्यालय अन् दोन गट; राष्ट्रवादीतील फुटीचे अधिवेशनात पडसाद
सोमवारी ११ ला रोजी पोरला, (गडचिरोली) येथील शिवाजी कनिष्ठ कला महाविद्यालय येथे होणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील. मंगळवारी १२ रोजी सायंकाळी राजभवन येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. बुधवार १३ डिसेंबर रोजी सकाळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात अधिकाऱ्यांची बैठक घेतील.