बुलढाणा : राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिर येथे भेट देऊन समाधी स्थळाचे दर्शन घेतले. शेगावात आगमन झाल्यावर राज्यपाल बैस यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मंदिर प्रशासनातर्फे औक्षवन करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी राज्यपालांनी समाधीचे व श्रींच्या गादीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी संस्थानाला मिळालेल्या देणग्या, राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि समाजपयोगी विकासकामांची माहिती घेतली.

हेही वाचा – नागपूर : एसटी कंडक्टर महिलेचे लैंगिक शोषण

मंदिर प्रशासनातर्फे निळकंठ पाटील यांनी राज्यपाल श्री. बैस यांचा सत्कार केला. यावेळी आमदार आकाश फुंडकर, विभागीय आयुक्त निधी पांण्डेय, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor ramesh bais visit to gajanan maharaj temple at shegaon scm 61 ssb
Show comments