नागपूर : भारत विकास परिषदेचे एक दिवसीय संमेलन येत्या २९ सप्टेंबर रोजी रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्घघाटनाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व समारोपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारत विकास परिषदेच्या विदर्भ शाखेची बैठक सोमवारी गोकुळपेठ येथील संपर्क कार्यालयात झाली. बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस श्याम शर्मा व क्षेत्रीय अध्यक्ष सुधीर पाठक, विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर घुशे उपस्थित होते. 

श्याम शर्मा यांनी सांगितले,भारत विकास परिषद समाजात सेवा व संस्कार रुजवण्याचे काम करते. त्यात अधिक वाढ व्हावी या उद्देशाने एक दिवसीय संमेलन सप्टेंबर महिन्यात होणार आहे. यात भारत विकास परिषदेची वर्तमान स्थिती व भविष्यातील कार्यपद्धतीवर चर्चा होईल तसेच देशाच्या जडणघडणीत प्रबुद्ध लोकांच्या भूमिकेवर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.