वाशीम : सिनेअभिनेता गोविंदा आज वाशीम शहरात येणार असल्याने त्याला पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होईल, असा अंदाज होता. मात्र महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रोड शोला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. गोविंदा बाहेर कमी आणि गाडीतच जास्त असल्यामुळे त्याला पाहण्यासाठी आलेल्यांना देखील गोविंदा बाहेर या म्हणून नारेबाजी करावी लागली. तरीही तो बाहेर न आल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.

राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ गोविंदा यांच्या रोडशोला शहरात अल्प प्रतिसाद मिळाला. रोडशोला सिव्हिल लाईन येथून प्रारंभ झाला. सिव्हिल लाईन मार्गे बस स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक या रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रोडशो झाला. यावेळी शिवसेनेच्या नेत्या तथा मुंबईच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे, आमदार लखन मलिक,राजू पाटील राजे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
BJP leader former MP Navneet Ranas campaign vehicle get viral in Amravati
नवनीत राणा म्‍हणतात, “…त्या नेत्यांचा हिशेब करा”, प्रचार वाहनाची जोरदार चर्चा

हेही वाचा…लोकसभेच्या रिंगणात उमेदवारांची उणीदुणी; जनतेचे मनोरंजन! उमेदवारांनी विकासावर बोलण्याची मतदारांची अपेक्षा

या रोडशोला गोविंदा येणार असल्याने मोठा प्रतिसाद मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु तसे घडले नाही. रस्त्याच्या जवळील लोकांनीच गोविंदाला पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र गोविंदा जास्तीत जास्त वेळ गाडीतच असल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा…महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !

या रोडशो दरम्यान गोविंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करेल अशी आशा होती. लोकांनाही तसेच वाटत होते. मात्र गोविंदाने बाहेर न येता गाडीतूनच नमस्कार केल्याने शहरात नाराजीचा सूर उमटला.