शासकीय विज्ञान संस्था नागपूरचे संकेतस्थळ ‘हॅक’ करण्यात आले आहे. त्यावर वादग्रस्त संदेश झळकत आहे. त्यात ‘आम्ही शांत बसणार नाही’, असा इशारा देण्यात आला आहे.

“भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा हा परिणाम आहे. भारतातील सर्व घडामोडींवर आमचे लक्ष आहे. सध्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागितली जात असली तरी त्याला अर्थ नाही.” असे संकेतस्थळावरील संदेशात नमूद आहे.

समाजमाध्यमांवर याचा निषेध होत आहे.

Story img Loader