गोंदिया: ग्रामपंचायतमध्ये बसलेल्या सरपंचावर हल्ला झाल्याची घटना घडली. प्रथम बाचाबाची व त्यातून वाढलेल्या वादातून हाणामारी व त्यानंतर चाकूने हल्ला केला असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. सरपंचांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हल्ला करणाऱ्याला अटक केली आहे. या घटनेमुळे गाावातील वातावरण काही काळापुरते तापले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तूमखेडा खुर्द येथील सरपंच आशिष हत्तीमारे (३५) ग्रामपंचायत मध्ये बसलेले होते. त्यावेळी आरोपी प्रेमलाल मेंढे (५५) यांनी ग्रामपंचायत बसलेल्या सरपंचांसोबत वाद घालून नंतर चाकूने हल्ला केला. दरम्यान, ग्रामपंचायत बाहेर बसलेल्या इतर सदस्यांनी लगेच सतर्कता दाखविल्यामुळे हा चाकू हल्ला टाळता आला. व इतरांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला.

हेही वाचा… बुलढाणा: विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; दुष्काळग्रस्त ७३ महसूल मंडळात विविध सवलती

पण हा वाद अखेर ग्रामपंचायतच्या आतमधून बाहेरपर्यंत येऊन या दोघांमध्ये ‘फ्रीस्टाइल’ने हाणामारीत झाला. त्यावेळी ग्रामपंचायतीत उपस्थितांनी घटनेचे चित्रण मोबाईल कॅमेरात केले असून समाज माध्यमांवर पसरविले. त्यानंतर सरपंचांनी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रेमलाल मेंढेला पोलिसांनी अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayat sarpanch from gondia was attacked with a knife sar 75 dvr