लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चंद्रपूर: योगा शेड बांधकामाचे देयक काढून देण्याच्या कामासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना उमरी पोतदार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. देवानंद मुरलीधर गेडाम असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.
कंत्राटदाराने पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार ग्रामपंचायत अंतर्गत गावात योगा शेडचे बांधकाम केले. या बांधकामाचे ३ लाख ४९ हजार ३२१ रूपये झाले होते. सर्वप्रथम ग्रामसेवक देवानंद गेडाम यांनी २ लाख ४० हजारांचे देयक काढून दिले. त्यानंतर उर्वरित देयक काढून देण्यासाठी ५ टक्के याप्रमाणे १७ हजार ५०० रुपये लाच मागितली.
आणखी वाचा-‘या’ मार्गावरील तब्बल ३५ रेल्वे गाड्या रद्द, कारण…?
कंत्राटदाराने त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाने सापळा रचून तडजोडीअंती १३ हजार रुपये स्वीकारतांना देवानंद गेडाम यास अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांच्या पथकाने केली.