राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचार्य, व्यवस्थापन, शिक्षक मतदार संघात शिक्षण मंचाला घवघवीत यश मिळाले तर महाआघाडीला जोरदार धक्का बसला आहे. बुधवारी पहाटे निकालजाहीर झाले. त्यानुसारशिक्षक मतदारसंघात शिक्षण मंचाने सहा जागांवर , नुटाने दोन जागांवर विजय मिळवला . महाआघाडीचे नेतृत्व करणारे आमदार ॲड. अभिजित वंजारी आणि डॉ. बबनराव तायवाडे यांना या निवडणुकीत धक्का बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला रात्री १२ वाजतानंतर सुरुवात झाली. यात खुल्या प्रवर्गातून (महिला ) विद्या साबळे विजयी झाल्या. त्या परीक्षा संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्या पत्नी आहेत. ओबीसीमधून नुटाचे डॉ. नितीन कोंगरे, अनुसूचित जाती प्रवर्गातून पांडुरंग डांगे, अनुसूचित जमाती प्रवर्गातून रतीराम चौधरी भटके विमुक्त जाती मधूनअनिल दोडेवार विजयी झाले. यानंतर खुल्या वर्गातील पाच जागांसाठी पहाटेपर्यंत मतमोजणी सुरू होती. यामध्ये सर्वात आधी नुटाचे डॉ. अजित जाचक निवडून आले. यानंतर श्रीकांत भोवते, योगेश भुते, संजय चौधरी, संदीप गायकवाड विजयी झाले. शिक्षक गटात मंचाला सहा जागांवर विजय मिळवता आला आहे.

हेही वाचा: ‘गद्दार, गद्दार, ५० खोके एकदम ओक्के’; विनायक राऊतांसमोर शिवसैनिकांची भावना गवळींविरोधात घोषणाबाजी

महाविद्यालय शिक्षक मतदार संघ
महिला- विद्या साबळे- शिक्षण मंच
ओबीसी- नितीन कोंगरे- नूटा
एसटी- रतीराम चौधरी- शिक्षण मंच
एससी- पांडुरंग डांगे- शिक्षण मंच
व्हीजेएनटी- अनिल दोडेवार- शिक्षण मंच

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grand alliance shocks teachers group in nagpur university elections winning six seats open category tmb 01