चंद्रपूर :उपक्रमशील शिक्षक असेल तर विद्यार्थी घडतात, त्यांचे भविष्य उज्वल होते. ग्रामीण भागात अशा उपक्रमशील शिक्षकांमुळे असंख्य विद्यार्थी घडले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिक्षण घेतात. या भागात संयुक्त कुटुंबपध्दती असते.आई वडील शेती व रोजीच्या कामात राहतात. अशावेळी त्यांचे आजी आजोबाच त्यांचा सांभाळ करतात. मग तेच आपल्या नातवंडाचे मार्गदर्शक असतात. नेमका हा मुददा ओळखत एका शिक्षकाने आजी आजोबांना सोबत घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. प्रशांत भोयर असे या शिक्षकाचे नाव असून ते वढोली येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत.

मूळचे गोंडपिपरीचे येथील रहिवासी असलेले प्रशांत भोयर मागील काही वर्षापूर्वी तब्बल बारा वर्षाच्या संधर्षानंतर त्यांची शिक्षकपदी निवड झाली.ते वढोलीच्या जिल्हा परिषदेत रूजू झाले.गोंडपिपरीवरून वढोलीचे अंतर केवळ सात किलोमीटर आहे.ते आपल्या गावात राहून जाणे येणे करू शकले असते पण त्यांनी वढोलीत किरायाची खोली करून तिथेच राहणे पसंत केले.ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे.सोबतच शेतीपूरक व्यवसाय सुध्दा अशावेळी पालकांचे आईवडिल हे दिवसभर कष्टाचे काम करण्याकरिता बाहेर असतात.

हेही वाचा…निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

u

घरी आजी आजोबाच असतात.नातवंडाना सांभाळण्याचे काम ते करतात.नातवावंर त्यांचे विशेष प्रेम असते.नेमका हाच धागा पकडून भोयर यांनी शाळेत आजी आजोबा नावाचा विशेष उपक्रम सुरू केला.प्रत्येक घरी जात त्यांनी आजी आजोबांची भेट घेतली.त्यांना शिक्षण किती महत्वाचे आहे याच महत्व पटवून दिलं.गावातील विद्याथ्र्याच्या आजीआजोबांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी आजीआजोबा शैक्षणीक समुह गट स्थापन करण्यात आला.नातवंडासह आजी आजोबांना शाळेत नियमीतपणे बोलावून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम प्रशांत भोयर यांनी केले.त्यांचा हा उपक्रम नियमीतपणे सुरू आहे.या उपक्रमाचा एवढा सकारात्मक परिणाम झाला कि,आजीआजोबांनाही हा अफलातून प्रयोग मस्तच वाटला ते आता अतिशय हिरारीने या उपक्रमात सहभागी होत आपल्या नातवंडाला अभ्यासासाठी प्रोत्साहन देत आहेत.शिक्षक प्रयोगशिल असला कि त्याचा मोठा फायदा हा विद्याथ्र्यांना होतो.अशावेळी प्रशांत भोयर या शिक्षकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाची सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.भोयर यंाच्या या उपक्रमात मुख्याध्यापक सुनील तोडासे,रेकचंद झाडे यांचे मोठे सहकार्य लाभले.

हेही वाचा…नागपूर विभागीय ‘लोकसत्ता लोकांकिका’ प्राथमिक फेरीची दमदार सुरुवात

“ग्रामीण भागात आई-वडील कामासाठी जातात.संयुक्त कुंटुंब असल्याने आजीआजोबा पुर्णवेळ घरी असतात.नातवंडाविषयी त्यांच्यात विशेष प्रेम असते.नेमका हाच धागा पकडून मी हा उपक्रम सुरू केला.त्याला मोठाच प्रतिसाद मिळत आहे.”प्रशांत भोयर, शिक्षक,जिल्हा परिषद शाळा,वढोली.

Story img Loader