वर्धा : देवळी तालुक्यातील खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. अल्पवयीन नातू तसेच महेश गजानन कोडापे वय १८ व हर्षद दिलीप पराडकर वय २० यांना अटक करण्यात आली असून ते वर्धा येथील रहिवासी आहे.

हेही वाचा – सहा लाखांचे बक्षीस असलेल्या तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक; छत्तीसगड सीमेवरील जंगलात पोलिसांची कारवाई

हेही वाचा – शासकीय नोकरीच्या स्वप्नावर पाणी!; बाह्ययंत्रणेद्वारे महत्त्वाच्या पदांवर मनुष्यबळ भरतीचा निर्णय

६५ वर्षीय अरुण डहाके यांचा डोक्यात शस्त्र हाणून निर्घृण खून करण्यात आला होता. चोरी की वैमनस्य अशी शंका उपस्थित झाल्याने तपास मोठे आव्हान ठरले होते. आईच्या वडिलांकडे भरपूर पैसे असल्याची नातवास माहिती मिळाली. ते चोरण्यासाठी त्याने कट रचला. मित्रांसह मिळून त्याने रात्री गिरोली गाठले. पैसे चोरून पळून जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र घरात घुसल्यावर आजोबांना जाग आली. त्यामुळे आरोपी घाबरले. तेव्हा खून करण्याचा निर्णय घेतला, अशी कबुली त्यांनी दिली आहे. स्थानिक गुन्हा शाखेने आरोपींचा छडा लावला.