नागपूर : विदर्भातील शेतमाल आता विदेशात निर्यात होऊ लागला आहे. या भागातील प्रसिद्ध संत्री दोनच दिवसापूर्वी ओमानमध्ये पाठवण्यात आली. त्यानंतर रविवारी १४ टन हिरवी मिरची दुबईच्या बाजारपेठेत पाठवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भातील संत्री निर्यात व्हावी म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. ‘महाऑरेंज’ने फळांवर कोटिंग करण्याची तसेच शीतगृहाची व्यवस्था केली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून दिवसापूर्वी ओमानला विमानाव्दारे संत्री पाठवण्यात आली. त्यानंतर कृषी खात्याच्या अखत्यारितील ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सीच्या (‘आत्मा’) बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातर्गत (स्मार्ट) ८ डिसेंबरला नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची १४ टन हिरवी मिरची शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून थेट दुबईला निर्यात करून आंतरराष्ट्रीय बाजर पेठेत पाऊल ठेवले आहे. दुबईत हिरव्या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी असून त्याचे दरही चढते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’

हेही वाचा – मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर फडणवीस यांचा पहिला नागपूर दौरा ठरला, स्वागताची जय्यत तयारी

दुबईला पाठवण्यात आलेल्या मिरचीचे वाण ‘गौरी’ आहे. निर्यात योग्य मिरची पिकवण्यासाठी आत्मातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले होते. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. निर्यातीसाठी नागपूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेतला होता. ही मिरची दुबईतील ‘अवर वेलनेस विलेज’ आणि ‘टायटन’ या कंपन्यांच्या बाजारात विकण्यात येणार आहे. निर्यातीसाठी राज्याचे पणन मंडळ आणि ‘महाऑररेंज‘ यांचेही सहकाय्र लाभले. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाला महाऑरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू , पणन महामंडळाचे विभागीय सह संचालक अजय कडू, स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी पल्लवी तलमले, पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ श्रीमती स्वाती गावंडे, युनिव्हर्स एक्सपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण वानखेडे उपस्थित होते.