महाराष्ट्राच्या पथकापुढे मात्र प्रश्नचिन्ह

काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश- ओडिशा राज्यांच्या सीमेवर ओडिशात २४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या आंध्रच्या ‘ग्रेहाऊंड’ या विशेष पथकाने एक दशकानंतरही कारवाईच्या संदर्भातील अचूक परिणामकारकता कायम राखली आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी अशीच पथके स्थापण्याचा प्रयोग महाराष्ट्रासह काही राज्यांनी केला, पण त्यांना ‘ग्रेहाऊंड’सारखे यश मिळवता आलेले नाही.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
hinganghat vidhan sabha constituency
हिंगणघाटमध्ये बंडखोर उमेदवार निर्णायक ठरणार ?
maharshtra electoral history
महाराष्ट्राची निर्मिती, काँग्रेसचे वर्चस्व, हिंदुत्वाचा उदय; महाराष्ट्र निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?
Pune Prime Minister Narendra Modi Pandit Jawaharlal Nehru Pune print news
पुणे आवडे पंतप्रधानांना!
maharashtra assembly election 2024 karnataka telangana and himachal pradesh bjp leaders criticized congress
काँग्रेसशासित राज्यांमध्ये केवळ फसवणूक; कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील भाजपा नेत्यांची टीका
bjp leader ashish shelar article allegations on shiv sena ubt for plot grab in dharavi
पहिली बाजू : भूखंड खादाडांचा डाव उद्ध्वस्त

दोन दशकांपूर्वी नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव शेजारच्या आंध्र प्रदेशात होता. त्यांचा बीमोड करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक के. दुर्गाप्रसाद व अतिरिक्त महासंचालक अरविंदराव यांनी ‘ग्रेहाऊंड’ या प्रशिक्षित जवानांच्या पथकाची निर्मिती केली. गनिमी युद्धाचे कठोर प्रशिक्षण घेतलेले जवान तयार करून चालणार नाही, तर नक्षलवाद्यांची माहिती मिळवणारी एक स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागेल, हे लक्षात आल्यावर या अधिकाऱ्यांनी विशेष गुप्तचर विभाग तयार केला. हे पथक व विभागाचे मुख्यालय जाणीवपूर्वक हैदराबादला ठेवण्यात आले. ग्रेहाऊंडमध्ये पोलीस दलातूनच जवान निवडण्यात आले, पण तत्पूर्वी त्यांची परीक्षा घेण्यात आली. आजमितीला या पथकात सहा हजार जवान कार्यरत आहेत. राज्याच्या विभाजनामुळे या पथकाचेही दोन भाग झाले असले तरी त्यांच्या कार्यशैलीत फरक पडलेला नाही, हे अलीकडच्या काळात या पथकाने बजावलेल्या कामगिरीतून दिसून आले आहे. या गुप्तचर विभागाने नक्षलग्रस्त भागात पेरलेले खबरे व विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळवायची. त्याचा आधार घेत ग्रेहाऊंडने थेट घटनास्थळ गाठून कारवाई करायची. या कारवाईचा सुगावा स्थानिक पोलिसांनासुद्धा लागू द्यायचा नाही, ही या पथकाची काम करण्याची पद्धत आहे. या पथकात नेमके कोणते जवान कार्यरत आहेत, याची माहिती मोजके अधिकारी वगळता कुणालाही नसते. या पथकाने गाजावाजा करून फिरायचे नाही, असे निर्देश आहेत. पथकात काम करणाऱ्या जवानांना १५ दिवस काम व १५ दिवस सुटी असते. या पथकात सामील जवानांचे दर वर्षी २८ दिवसांचे उजळणी वर्ग घेतले जातात. यात अपयशी ठरलेल्या जवानांना मूळ पोलीस दलात परत पाठवले जाते. या जवानांना दलात मिळणाऱ्या वेतनापेक्षा ६० टक्के जास्त रक्कम वाढीव वेतन म्हणून दिली जाते. या जवांनाना लंबाडा, खोया, गोंड, नायक पोडू या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी जमातींची भाषा शिकवण्यात आलेली आहे.

इतर राज्ये अपयशी

ग्रेहाऊंडपासून प्रेरणा घेत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओदिशा, बिहार, झारखंड, बंगाल या राज्यांनी अशी पथके तयार केली, पण कठोर प्रशिक्षण व कार्यपद्धतीच्या मुद्दय़ावर लक्ष न दिल्याने या राज्यांना ग्रेहाऊंडसारखे यश मिळू शकले नाही. त्या तुलनेत महाराष्ट्राच्या सी-६० पथकाने अनेकदा चमकदार कामगिरी केली, पण यात सातत्य राहिले नाही. सी-६० ला रोडओपनिंगसारखी कामे देणे, जनजागरण मेळाव्यात लोक आणण्याची जबाबदारी देणे, यामुळे या पथकाची परिणामकारकता कमी झाली. दर वर्षी उजळणी नाही, कठोर निकष नाही, आहे तेच जवान वर्षांनुवर्षे पथकात ठेवायचे, या पथकाला माहितीसाठी आवश्यक असलेली गुप्तचर यंत्रणा उभारली नाही. त्यामुळे सी-६० चा प्रयोग म्हणावा तसा यशस्वी ठरला नाही. छत्तीसगड, ओदिशा, बिहार व झारखंड येथेही वेगवेगळ्या नावाने अस्तित्वात असलेली ही पथके केवळ केंद्रीय सुरक्षा दलाला सोबत व्हावी म्हणून वापरण्यात येतात. त्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून आलेले नाहीत. ग्रेहाऊंडचे यश लक्षात घेऊन केंद्रीय राखीव पोलीस दलाने कोब्रा बटालियन तयार केली. त्याची जबाबदारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर आणून ग्रेहाऊंडचे जनक दुर्गाप्रसाद यांनाच देण्यात आली, पण ही बटालियनसुद्धा यशस्वी ठरू शकली नाही.

प्रमुख कामगिरी

ग्रेहाऊंडच्या जवानांनी दिल्लीत सापळा रचून कोबाड घांगीला पकडून दिले. केंद्राशी वाटाघाटी करण्यासाठी इच्छुक असलेला केंद्रीय समिती सचिव आझादला नागपुरातून उचलले व आदिलाबादच्या जंगलात नेऊन ठार मारले. मलकानगिरीच्या चकमकीत या पथकाने जहाल नक्षलवादी रामकृष्णाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. अनेक जहाल नक्षलवाद्यांना सापळा रचून ताब्यात घ्यायचे, त्यांच्याकडून माहिती काढून घ्यायची व नंतर चकमकीत ठार झाला, असे घोषित करायचे, अशीही कामगिरी या पथकाच्या नावावर आहे. आंध्र व तेलंगणातून नक्षलवादी चळवळीच्या हिंसक कारवाया संपुष्टात आणण्यात या पथकाचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे.

गनिमी काव्यात यश

नक्षलवाद्यांच्या दलामध्ये शिरून त्यांचा नायनाट करण्यात हे पथक वाकबगार आहे. युद्धाच्या भाषेत याला ‘कोव्हर्ट ऑपरेशन’ म्हणतात. प्रारंभीच्या काळात या पथकाचे अनेक जवान चळवळीचा प्रभाव असणाऱ्या खेडय़ात मजूर म्हणून राहिले. तेथे त्यांनी नक्षलवाद्यांचा विश्वास संपादन केला, मग दलममध्ये प्रवेश मिळवला व काही काळ त्यांच्यासोबत राहून योग्य संधी मिळताच ग्रेहाऊंडला संदेश पाठवून चकमकी घडवून आणल्या. आता दोन वर्षांपूर्वी अहेरी तालुक्यात व्यंकटापूरजवळ ग्रेहाऊंडचा असाच एक जवान हेर म्हणून नक्षलवाद्यांच्या कळपात शिरला. त्याच्याजवळ जीपीएस यंत्रणा देण्यात आली होती. अमुक स्थळी दलम येताच त्याने ही यंत्रणा सुरू करायची व त्याचा माग घेत बाहेर दबा धरून बसलेल्या जवानांनी कारवाई करायची, असे ठरले. ठरल्याप्रमाणे ही मोहीम फत्ते झाली व नक्षलवादी मारले गेले. नुकत्याच मलकानगिरीत झालेल्या चकमकीच्या वेळी या पथकाने दलमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या नक्षलवाद्यांजवळ वॉकीटॉकी असते व तो पोलिसांची चाहूल लागताच सूचना देतो, त्यामुळे इतर सहकारी पळून जाण्यात यशस्वी होतात, हे लक्षात घेऊन सोबत जॅमर नेले होते. त्यामुळे वॉकीटॉकी कामच करू शकली नाही व अख्खे दलम पथकाच्या तावडीत सापडले. ग्रेहाऊंडच्या भीतीमुळे अनेकदा दलम पळून जातात म्हणून या पथकाने जवानांचा समावेश असलेले बोगस दलम तयार करून ते जंगलात सोडले. या दलमने गावकऱ्यांवर जाणीवपूर्वक अत्याचार केले. यामुळे हे नवीन कोण, असा प्रश्न करीत गावात आलेल्या नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. ग्रेहाऊंडने केवळ आंध्र व तेलंगणाच नाही, तर शेजारच्या राज्यात घुसून अनेक नक्षलवाद्यांना ठार केले आहे.