नागपूर: भारतीय जनता पक्षातर्फे सध्या देशभर मंदिर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते यात सहभागी झालेत. त्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकली. नागपूरही यात मागे नाही.

नागपूरमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. वाठोड्यातील एका हनुमान मंदिरात स्वच्छता मोहीम सुरू असताना तेथे नमस्कारासाठी आलेल्या नवरदेवालाही कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेतले आणि लगेच त्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार

हेही वाचा – देशभरातच थंडीचा कडाका वाढला; उत्तरेकडील राज्यांना थंडीचा ‘रेड’ व ‘ऑरेंज’ अलर्ट

हेही वाचा – वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वाक्षरी उमटली बंगल्याच्या भाळी, चित्रकार तीळले बंधूंची कमाल…

अयोध्येतील राममंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सध्या देशभर भाजपतर्फे वातावरण निर्मितीसाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. मंदिर स्वच्छता हा त्यापैकीच एक. देश, राज्य पातळीवरील नेत्यांचा सहभाग या कार्यक्रमात असल्याने स्थानिक नेते मागे राहणे शक्य नव्हते. बुधवारी सकाळी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र उर्फ बंटी कुकडे यांनी वाठोडास्थित हनुमान मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली. त्याचवेळी लग्नासाठी जात असलेला नवरदेव हनुमानजींच्या दर्शनासाठी मंदिरात आला. तेथे सुरू असलेली स्वच्छता मोहीम पाहून तोही त्यात सहभागी झाला.