लोकसत्ता टीम
चंद्रपूर : पंचायत समिती सावलीचे गटशिक्षणाधिकारी लोकेश खंडाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
आणखी वाचा-निसर्गाचा सफाई कामगार ! दोन महिन्यांची विश्रांती अन् झेपावला आकाशी
सावली पंचायत समितीच्या चीचबोडी ग्रा. पं. अंतर्गत येत असलेल्या नवेगाव फाल येथील एका शीक्षकाच्या तेरा महीन्याच्या मासीक वेतनाच्या थकीत देयका संदर्भात टाळाटाळ करण्यात येत असल्याने तेथील तत्कालीन शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापडा रचून सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान रंगेहात अटक केली. सदर कारवाई चंद्रपूर लागत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.