100 Years of Rashtriya Swayamsevak Sangh : विजयादशमीनिमित्त संघाच्या परंपरेनुसार शनिवारी सकाळी रेशीमबाग मैदानातून पाऊस सुरू असताना गणवेशनात पथसंचलनाला सुरूवात झाली. एरवी दोन वेगवेगळ्या भागातून पथसंचलन सुरू होते. परंतु,. यावेळी मात्र पाऊस असल्यामुळे एकाच भागातून पथसंचलन करण्यात आले. संगम टॉकीज जवळील तिरंगा चौकात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन आणि संघाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी अवलोकन केले.

पथ संचालनाद्वारे विविध महापुरूषांनाही अभिवादन करण्यात येते. त्यामुळे संघात पथसंचलनाला एक वेगळे महत्त्व आहे. शनिवारी सकाळी शहरातील स्वयंसेवकांचे एकत्रिकरण झाल्यानंतर सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी घोष वादनात रिमझीम पाऊस सुरू असताना रेशीमबाग मैदानातून पथसंचलनाला सुरूवात झाली.

हे ही वाचा…कट्टरतावादाला चिथावणीचा प्रयत्न, पोलीस त्यांचे काम करेलच, मात्र तोपर्यंत गुंडगिरी नाही पण आत्मसंरक्षण करा, सरसंघचालक

यावेळी व्यवसायी आणि विद्यार्थी अशा दोन पथसंचलनाला रेशीमबाग मैदानातून सुरुवात होणार होती मात्र ऐनवेळेवर एका मार्गाचे पथसंचलन रद्द करण्यात आले आणि एकच पथसंचलन निघाले. रेशीमबाग, पुष्पांजली– देवांजली अपार्टमेंट, गजानन चौक, आराध्य ज्वेलर्स, मयूर मंगल कार्यालय, गणेशनगर मैदान, सुरेश भट सभागृहासमोरुन रेशीमबाग मैदानावर पथसंचलन परत आले. रिमझीम पाऊस सुरू असताना पथसंचलनादरम्यान मार्गावर नागिरकांनी स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव केला. रेशीमबाग मैदानात परत आल्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.

पथसंचलनानंतर कार्यक्रमस्थळी दरवर्षी प्रमुख पाहुण्यां समोर स्वयंसेवकांच्या कवायती आणि घोष पथकाचे वादन होते. यावेळी मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्यामुळे कवायती करणे शक्य नव्हते. त्यामुळे कवायती व व घोष वादन झाले नाही. प्रमुख पाहुण्याचे भाषण सुरू असताना स्वयंसेवक उभे होते मात्र सरसंघचालक डॉ, मोहन भागवत यांच्या भाषणाच्यावेळी स्वयंसेवकांना खाली बसण्याचे आवाहन करण्यात आले. मैदानात चिखल असतानाही स्वयंसेवक खाली बसले होते.

हे ही वाचा…दीक्षाभूमीचा स्तुप दिसतो सुंदर…पण्, त्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा संघर्ष…

आज झालेल्या विजयादशमी सोहळ्याला मान्यवर पाहुण्यांमध्ये माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, अंतारिक्ष वैज्ञानिक के. शिवमजी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संपादक डॉ. रामासुब्बू बालाजी, उद्योजक सज्जन जिंदल, वेदांत अभ्यासक वक्ता शरफी मोहम्मद, उद्योजक जे, ध्रुवप्रकाश मल, झारखंड केंद्रीय विद्यालयाचे कुलपती सुरेंद्र प्रसाद, रायगड विभाग प्रचारक शिवराम शेट्टी, भास्कर कुळकर्णी, इंग्लंडमधील स्वयंसेवक डॉ. विदुला आंबेकर, मधुकर आंबेकर उपस्थित आहेत.