लोकसत्ता टीम

बुलढाणा : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या सोयाबिन, कपाशीला नगण्य भाव मिळत आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे. याचा विदर्भात सर्वाधिक लोकप्रतिनिधी असलेल्या भाजपला याचा मोठा फटका बसेल, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”

आणखी वाचा-“ओजसची कामगिरी नागपूरचे नाव जगात उंचावणारी” जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना तुपकर म्हणाले, राज्यातील सोयाबीन कापूस शेतकरी आर्थिक अडचणीच्या चक्रव्युहात अडकला आहे. अपुऱ्या पावसामुळे उत्पादन घटणार आहे. मशागतीचा खर्च दुप्पट तर उत्पादन अत्यल्प राहणार आहे. तसेच भाव सुद्धा मिळणार नाही. यामुळे आज शेतकरी अडचणीतच नाही तर आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. सत्ताधाऱ्यांना मात्र याच्याशी काहीच घेणे देणे नाही. याचा फटका भाजपच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनाही बसणार आहे. काल नाशिक जिल्ह्यात कांदा टोमॅटो उत्पादकांनी अजित पवारांचीच वाट अडवली. त्याचप्रमाणे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी या सत्ताधाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही.