राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत. त्यांच्या पदाचा अधिकाधिक लाभ करून घेण्याच्या दृष्टीने खासदार रामदास तडस व आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मगण्यांचा सपाटाच लावला. राज्य परिवहन मंडळाच्या सेवेतील बसेसची कमतरता दिसून आल्यावर वाढीव बसगाड्यांची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पन्नास बसेस मंजूर केल्या आहेत. त्यातील दहा बसेस सेवेत दाखलही झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसटीच्या विभागीय अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांची एक बैठक खासदार तडस यांनी बुधवारी घेतली. त्यात बसेसबाबत माहिती देण्यात आली. याच बैठकीत नागपूर ते यवतमाळ या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न निघाला. मार्गावरील देवळी, केळझर, सालोड, सेलू येथील प्रवाशांना परस्पर पुलावर उतरवून दिल्या जाते. बसेस स्थानकात जात नसल्याचे निदर्शनास आणल्यावर संदीप रायलवर यांनी यापुढे असे होणार नसल्याची ग्वाही दिली. पुलगाव येथील नूतन बस स्थानकाच्या आराखडा यावेळी सादर करण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister devendra fadnavis approves additional fifty buses pmd 64 amy
Show comments