लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा: जळगावसह जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराने थैमान घातले असतानाही पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेच नाही. यामुळे जळगाव तालुका शिवसेनेने थेट पोलिसांत पालकमंत्री बेपत्ता झाल्याची तक्रार दिली! एवढेच नव्हे तर शोधणाऱ्यास अकराशे रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

आणखी वाचा-‘लोकसत्ता’च्या वृत्ताची विधानसभेत दखल; गडचिरोलीतील युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेल्याचे प्रकरण

संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळाले. शेकडो शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली, अनेक घरे जमीनदोस्त झाली तर अनेक घरातील गृहोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. मात्र पालकमंत्री पाटील यांनी साधी धावती भेटही जिल्ह्यात दिली नाही. उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister gulabrao patil missing shiv sena directly complained to the police scm 61 mrj
Show comments